agriculture news in marathi, Registration of Seed Production Area of ​​Rabi Crops | Agrowon

रब्बी पिकांच्या बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी सुरू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

परभणी ः बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडे यंदाच्या २०१८-१९ रब्बी हंगामामध्ये ज्वारी, हरभरा, गहू, करडई आदी पिकांच्या बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने बीजोत्पादक शेतकरी संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे.

करडई आणि रब्बी ज्वारीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत, हरभऱ्याची २० नोव्हेबरपर्यंत, गहू आणि इतर पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत क्षेत्र नोंदणी करता येईल. या तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा आहेत. क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर १५ दिवसांत करता येईल.

परभणी ः बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडे यंदाच्या २०१८-१९ रब्बी हंगामामध्ये ज्वारी, हरभरा, गहू, करडई आदी पिकांच्या बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने बीजोत्पादक शेतकरी संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे.

करडई आणि रब्बी ज्वारीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत, हरभऱ्याची २० नोव्हेबरपर्यंत, गहू आणि इतर पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत क्षेत्र नोंदणी करता येईल. या तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा आहेत. क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर १५ दिवसांत करता येईल.

यंदाच्या रब्बी हंगामात बीजोत्पादन घेत असलेल्या संस्था तसेच शेतकरी गट, शेतकऱ्यांसाठी परभणी येथील विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयातंर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथील जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरू आहे.

क्षेत्र नोंदणीकरिता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत, संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनिधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी यांच्यासह करण्यात येणारा ५०० रुपयाच्या बंध पत्रावरील करारनामा, स्त्रोत बियाणे खरेदी बिल, स्त्रोत बियाण्याचे मूळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बियाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकऱ्याच्या स्वाक्षरीत, परिपूर्ण माहिती भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, बीजोत्पादकाचे महसूल दस्तावेज (सात -बारा आणि नमुना आठ-अ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बीजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्त्रोत बियाणे वाटप अहवाल, गाव - पीक व दर्जानिहाय बीजोत्पादकांच्या विहित प्रपत्रातील याद्या ४ प्रतित इत्यादी कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे.

नोंदणी शुल्क ५० रुपये प्रतिबीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी शुल्क पायाभूत बीजोत्पादनासाठी प्रतिएकरी २०० रुपये प्रति व प्रमाणित बीजोत्पादनासाठी प्रतिएकरी १५० रुपये आहे. अधिक माहितीसाठी बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. कळसाईत यांनी केले आहे.

 

इतर बातम्या
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया...अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
लातूर :थकित पैशांसाठी अडत्यांचे उपोषणलातूर : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजर...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...