हमीभावाने मूग, उडीद खरेदीसाठी आजपासून नोंदणी
गोपाल हागे
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

अकोला : सध्या बाजारपेठेत मूग, उडदाला कमी दर मिळत असल्याने पणन खात्याने किमान आधारभूत दराने (एमएसपी) शेतमाल खरेदीची घोषणा केली अाहे. मागील खरेदीच्या वेळी शासकीय यंत्रणांची झालेली दमछाक पाहता या वेळी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची अाधी नोंदणी करावी लागणार अाहे.

यासाठी मंगळवार (ता. ३) पासून राज्यात जवळपास ८३ केंद्रांवर नोंदणी करता येणार अाहे. त्यानंतर शासनाच्या अादेशानुसार मूग, उडीद खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अकोला : सध्या बाजारपेठेत मूग, उडदाला कमी दर मिळत असल्याने पणन खात्याने किमान आधारभूत दराने (एमएसपी) शेतमाल खरेदीची घोषणा केली अाहे. मागील खरेदीच्या वेळी शासकीय यंत्रणांची झालेली दमछाक पाहता या वेळी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची अाधी नोंदणी करावी लागणार अाहे.

यासाठी मंगळवार (ता. ३) पासून राज्यात जवळपास ८३ केंद्रांवर नोंदणी करता येणार अाहे. त्यानंतर शासनाच्या अादेशानुसार मूग, उडीद खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतमालाला हमीभाव मिळावा या उद्देशाने शासनाकडून खरेदी केली जाते. सध्याच्या परिस्थितीत कुठल्याही बाजारात मूग, उडीद या पिकांना हमीभावसुद्धा मिळेनासा झालेला अाहे. मुगाचा दर ४२०० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटल अाणि उडीद ४१०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान विकत अाहे. वास्तविक मुगाला ५३७५ रुपये हमीभाव आणि २०० रुपये बोनस आहे, तर उडदाला ५२०० रुपये हमीभाव आणि २०० रुपये बोनस आहे.

हमीभाव व सध्या मिळत असलेल्या दरात सातशे ते अाठशे रुपयांची तफावत अाहे. अाधीच मूग, उडदाची पीक उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षा अधिक खालावलेली अाहे, त्यामुळे निदान हमीभाव तरी या शेतमालाला मिळावा, अशी मागणी केली जात होती.

शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी सर्वत्र झाल्यानंतर या मागणीला हिरवा कंदील मिळाला. परंतु या वेळी थेट केंद्र उघडले जाणार नाही. गेल्या काळात नाफेडच्या खरेदीत झालेले गोंधळ पाहता अाता शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतमालाची नोंदणी करून घेतली जाईल.

शेतकऱ्याला किती माल विकायचा अाहे, त्याने किती लागवड केली होती, याची माहिती दर्शविणारा सातबारा, पेरापत्रक, अाधार क्रमांक, बँक खात्याची सविस्तर माहिती हे सर्व सादर करावे लागेल. त्यानंतरच शासनाचे पुढील अादेश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी सुरू केली जाईल. शेतकऱ्यांना त्यांनी माल कधी विक्रीसाठी अाणायचा याचा मेसेज पाठवला जाणार अाहे.

राज्यात पहिल्या विविध जिल्ह्यांतील ८३ केंद्रांवर नोंदणीची सुविधा दिली जात अाहे. यात वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, शेगाव, खामगाव, मलकापूर, संग्रामपूर, देऊळगावराजा; अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर अाणि वाशीम जिल्ह्यातील वाशीम, मंगरुळपीर, कारंजा व रिसोड या केंद्रांचा समावेश अाहे.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...