agriculture news in marathi, registration of tur producers in jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमधील गावांमध्ये जाऊन केली जाणार तूर उत्पादकांची नोंदणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018
तूर उत्पादकांचा ऑनलाइन नोंदणीला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे आता शेतकी संघांनी गावोगावी जाऊन तूर उत्पादकांची नोंदणी करून घेण्यासंबंधी मार्केटिंग फेडरेशन आदेश देणार आहेत. प्रमुख गावांमध्ये नोंदणी होईल. शेतकऱ्यांचा सातबारा उतारा व इतर प्राथमिक माहिती संकलित केली जाईल. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन.
जळगाव  ः जिल्ह्यात सुमारे २५ दिवसांपासून शेतकी संघात तूर उत्पादकांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. परंतु नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधी अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील प्रमुख तूर उत्पादक गावांमध्ये जाऊन त्यांची नोंदणी करण्याचा निर्णय मार्केटिंग फेडरेशनने घेतला आहे. 
 
जिल्ह्यात या महिन्याच्या सुरवातीलाच नऊ शेतकी संघांना तूर उत्पादकांची तूर विक्रीसंबंधी नोंदणीचे आदेश मार्केटिंग फेडरेशनने दिले. हे आदेश दिल्यानंतर नोंदणी सुरू झाली, परंतु ऑनलाइन नोंदणीत अडचणी येऊ लागल्या. संबंधित अॅप व्यवस्थितपणे काम करीत नव्हते. तसेच सर्व्हर डाऊन व अप्रशिक्षित कर्मचारी आदी समस्याही येत होत्या. 
 
पाचोरा, अमळनेर, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव आदी आठ शेतकी संघांना नोंदणीच्या सूचना देण्यात आल्या. परंतु अजूनही शेतकऱ्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. एरंडोल येथेही एक केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न मार्केटिंग फेडरेशनने केला होता. परंतु त्यास मंजुरी मिळाली नाही. यातच फक्त ७०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून घेतली. काही केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद आहे. जामनेर, मुक्ताईनगर व बोदवड येथेच बरा प्रतिसाद आहे.
 
जिल्ह्यात साडेतीन हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. ही बाब लक्षात घेता किमान चार हजार शेतकऱ्यांची नोंदणी अपेक्षित आहे. नोंदणीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासह त्यांना तालुक्‍याला येण्याचा त्रास लक्षात घेता आता प्रमुख गावांमध्ये जाऊन नोंदणी करून घेतली जाईल.
 
ही नोंदणी ऑफलाइन असेल. त्यात सातबारा उतारा, बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदी आवश्‍यक कागदपत्रे घेतले जातील. परंतु नंतर संबंधित शेतकऱ्याची ऑनलाइन नोंदणी करून त्याच्याकडून तुरीची खरेदी होईल. 
 
सध्या शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने बाजार समिती व इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. ३८०० ते ४३०० रुपये क्विंटलपर्यंत दर आहेत. काही अडतदार तर यापेक्षा कमी दर देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...