agriculture news in marathi, Regular rain text to Marathwada | Agrowon

मराठवाड्याकडे पावसाची पाठ कायम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्याकडे पावसाने केलेली पाठ कायम आहे. पाच ते सहा दिवसांपासून काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांश मराठवाड्यात तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मराठवाड्यात जोरदार पाऊस येणार तरी केव्हा हा प्रश्न आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याकडे पावसाने केलेली पाठ कायम आहे. पाच ते सहा दिवसांपासून काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांश मराठवाड्यात तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मराठवाड्यात जोरदार पाऊस येणार तरी केव्हा हा प्रश्न आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या फुलंब्री, वडोदबाजार, पिरबावडा या तीन मंडळात शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत १० ते २० मिलिमीटरदरम्यान पाऊस पडला. औरंगाबाद तालुक्‍यातील भावसिंगपुरा, चौका, लाडसावंगी मंडळात १० ते ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पैठण तालुक्‍यातील आडूळ मंडळात ७, तर विहामांडवा मंडळात २ मिलिमीटर पाऊस नोंदल्या गेला.

सिल्लोड तालुक्‍यातील सिल्लोड, अजिंठा, अंबाई, गोळेगाव, मंडळात २ ते ९ मिलिमीटर, सोयगाव तालुक्‍यातील सोयगाव मंडळात २० मिलिमीटर, बनोटी ६, सावलदबारा ८, तर वैजापूर तालुक्‍यातील वैजापूर, शिवूर, महालगाव, लाडगाव, लासूरगाव, मंडळात २ ते ४ मिलिमीटर, कन्नड तालुक्‍यातील कन्नड मंडळात ६, चिकलठाणा ८ तर चापानेर ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यातील भोकरदन सिपोरा बाजार, आणि धावडा मंडळात १ ते ६ मिलिमीटर, जाफराबाद तालुक्‍यातील वरूड मंडळात १३ मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यातील मांदळमोही, पाचेगाव व सिरसदेवी मंडळात ३ ते १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हलकी सर पडल्याचे वृत्त आहे.
    
४० मंडळांत अपेक्षित पावसाच्या निम्मा पाऊस
मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ४० मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत निम्माच पाऊस पडला आहे. जालना व बीड जिल्ह्यांतील पाच मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत २५ टक्‍केही पाऊस पडला नाही. २४७ मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत जास्त पाऊस पडला असला तरी १३४ मंडळांत ५० ते १०० टक्‍क्‍यादरम्यान पाऊस पडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...