agriculture news in marathi, Rejecting the anticipatory bail application of twenty-four people | Agrowon

सव्वीस जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडांसह २६ जणांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी शुक्रवारी (ता.२२) फेटाळला. तत्कालीन संचालक महादेव चाकोते, अहमद निंबाळे व सचिव उमेश दळवी व धनराज कमलापुरे यांना मात्र जामीन मंजूर केला आहे. 

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडांसह २६ जणांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी शुक्रवारी (ता.२२) फेटाळला. तत्कालीन संचालक महादेव चाकोते, अहमद निंबाळे व सचिव उमेश दळवी व धनराज कमलापुरे यांना मात्र जामीन मंजूर केला आहे. 

चाकोते, निंबाळे, दळवी आणि कमलापुरे यांना ५० हजार रुपयांच्या जातमचुलक्‍यावर पोलिस ठाण्यात रोज हजेरी लावणे व साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला. या गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन सभापती दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह अनेक दिग्गज संचालकांचा समावेश आहे.

सध्या सुरू असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतील सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०११ ते २०१६ कालावधीत बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहारातील १४ मुद्‌द्यावर प्रशासक सुरेश काकडे यांनी तत्कालीन संचालक व सचिवांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 
अटकपूर्व जामिनासाठी संचालकांनी व सचिवांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्व जामीन अर्ज एकाच न्यायालयात चालवावेत, तत्कालीन संचालकांनी सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहावे, मोबाईल क्रमांक सादर करावे, अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आली.

या मागणीनुसार न्यायालयाने आदेश दिले. तत्कालीन संचालक गैरहजर राहिले, त्यांनी मोबाईल क्रमांकही सादर केले नाहीत, त्यांनी सादर केलेले माफीचा व मुदतवाढीचा अर्ज करण्याची तरतूद कोणत्याही कायद्यात नसल्याचा मुद्दा सरकार पक्षाच्या वतीने मांडण्यात आला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीपसिंग रजपूत, बाजार समितीच्या वतीने अॅड. उमेश भोजने, आरोपीच्या वतीने अॅड. धनंजय माने, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. भारत कट्टे, अॅड. शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...