`बोकटेतील बंधाऱ्यात पाणी सोडा`

`बोकटेतील बंधाऱ्यात पाणी सोडा`
`बोकटेतील बंधाऱ्यात पाणी सोडा`

नाशिक : येवला, मनमाड व ३८ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी आवर्तन दिल्यानंतर बोकटे येथील बंधारा भरण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी बाबासाहेब डमाळे, प्रताप दाभाडे, बापूसाहेब दाभाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली.

खेडकर यांनी तांत्रिक बाबी तपासून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे गुरुवारी (ता. २१) होणारा अंदरसुल येथील रास्ता रोको रद्द झाला. शिष्टमंडळाने गोदावरी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, पालखेड कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने व उपकार्यकरी अभियंता वैभव भागवत यांच्या भेटी घेतल्या.  याप्रसंगी खेडकर यांनी उपोषण, रास्ता रोको न करण्याची विनंती केली. त्यानुसार शिष्टमंडळाने आंदोलन तूर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मोरे म्हणाले, ''पिण्याचे पाणी हे जिल्हाधिकारी प्रासंगिक आरक्षणातील असल्याने त्यांनी आदेश दिल्यास पाटबंधारे विभाग पाणी सोडण्याचे नियोजन करून देईल.''

या शिष्टमंडळात बाबा डमाळे, प्रताप दाभाडे, बापूसाहेब दाभाडे, महेंद्र जाधव, शिवाजी कोटमे, डॉ. शरद काळे, संतोष काळे, नवनाथ काळे, गणेश जगताप, ज्ञानेश्वर काळे, हितेश दाभाडे, हरिभाऊ पागिरे, ज्ञानेश्वर दाभाडे, विजय दाभाडे, अशोक दाभाडे आदी शेतकरी उपस्थित  होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com