agriculture news in marathi, Relief for kharif crops due to rain in Pune division | Agrowon

पुणे विभागात पावसामुळे खरीप पिकांना दिलासा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तूर, मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, भात, कपाशी या पिकांना दिलासा मिळाला. सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. येत्या काळात आणखी पाऊस झाल्यास पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तूर, मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, भात, कपाशी या पिकांना दिलासा मिळाला. सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. येत्या काळात आणखी पाऊस झाल्यास पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामात सुरवातीच्या काळात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. मात्र, नंतर पावसाने ओढ दिल्यानंतर पिकांची काही प्रमाणात वाढ खुंटली होती. अनेक ठिकाणी पिके सुकत असल्याची स्थिती होती. मागील आठवड्यापासून पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी बरसल्या. त्यामुळे खरिपातील पिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला. विभागात सरासरीच्या सात लाख ८८ हजार ४८० हेक्टरपैकी सात लाख ९३ हजार २५० हेक्टर म्हणजेच शंभर टक्के पेरणी झाल्यामुळे या सर्व क्षेत्रावरील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात ११ हजार ३६९ हेक्टरवर भात रोपांची पुनर्लागवड झाली आहे. बाजरी, भात पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मूग पीक काही ठिकाणी फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी मूग पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. उडीद पीकही फलोरा अवस्थेत आहे. भूईमूग पीकवाढीच्या अवस्थेत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस नसल्यामुळे कापूस पिकांची वाढ खुंटली होती. मात्र, आता पाऊस झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती व पुरंदर या तालुक्यांत मूग, उडीद, कापूस, सोयाबीन पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी व दक्षिण सोलापूर या तालुक्यात पेरणी झालेले मूग व उडीद पिके फुलोऱ्यांच्या अवस्थेत आहे. तूर, सोयाबीन, सूर्यफूल ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. उर्वरित तालुक्यात पिकांची पेरणी उशिरा झालेली असून पिके वाढीच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद व सोयाबीन पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

अजूनही भात पिकांच्या लागवडी सुरू
पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्यात सुमारे ५७ हजार ३३४ हजार हेक्टरवर भाताची पुनर्लागवड झाली असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी मजुरांअभावी पुनर्लागवडी लांबल्या असून, अजूनही भात पिकांच्या लागवडी सुरू आहेत.

इतर बातम्या
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
विहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...