गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण विकासासाठी हिंगोली येथील उगम ग्रामीण विकास संस्था
बातम्या
जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यात पेरणी ७० टक्क्यांवर पोचली आहे. कापसाची लागवड अधिक झाली अाहे. मागील दोन दिवसांत झालेल्या रिमझिम पावसाने पिकांना दिलासा मिळाला असून, पेरणीला आणखी गती मिळणार आहे.
मध्यंतरी पुरेसा पाऊस नसल्याने पेरणी रखडली होती. रावेर, मुक्ताईनगर, यावल या तापी पट्ट्यात हवा तसा पाऊस नसल्याने फक्त ५० टक्के पेरणी झाल्याचा अहवाल होता. परंतु मागील तीन दिवसांत खानदेशात सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना सुरवात झाली अाहे.

जळगाव जिल्ह्यात ७ लाख ६५ हजार हेक्टरपैकी सुमारे साडेसहा लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. धुळे जिल्ह्यात ४ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या अपेक्षित असून, यातील साडेतीन लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यात कापसाची साडेपाच लाख हेक्टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. कापसापाठोपाठ तृणधान्य व कडधान्याची पेरणी झाली आहे.
सोयाबीनची जेमतेम पेरणी
जळगाव जिल्ह्यात मागील हंगामात २९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. परंतु जूनमध्ये पेरणी केलेल्या सोयाबीनला पुरेसा पाऊस न मिळाल्याने पीक मोडण्याची वेळ आली. नंतर हे क्षेत्र रिकामे झाले. धुळे जिल्ह्यातही शिरपूर येथे सोयाबीनची अपेक्षित पेरणी झालेली नाही. धुळे व जळगाव जिल्ह्यात २५ ते २९ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. पेरणीचे ९० टक्के उद्दिष्ट यंदा साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. जुलैअखेरपर्यंत पेरण्या होतील. काही भागांत कोरडवाहू कापूस लागवड सुरू आहे.
- 1 of 563
- ››