agriculture news in marathi, Removal of the difference in agricultural sector: Dr. Dangat | Agrowon

कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर करा : डॉ. दांगट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात औद्योगिक व सेवाक्षेत्राचा सातत्याने लाभ झाल्याचे दिसत असला तरी कृषी क्षेत्राचा लाभ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या क्षेत्रामधील उत्पन्नाची तफावत दूर करावी लागेल. विक्रीच्या बाजारपेठेत आजही शेतकरी भरडला जातोय. त्यामुळे मुक्‍त बाजारपेठ, कमी निर्बंधांची गरज आहे. त्यासाठी कालबाह्य कायद्यांचा नव्याने आढावा घेण्याची गरज आहे, असे मत माजी आयुक्‍त तथा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्‍त केले.

औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात औद्योगिक व सेवाक्षेत्राचा सातत्याने लाभ झाल्याचे दिसत असला तरी कृषी क्षेत्राचा लाभ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या क्षेत्रामधील उत्पन्नाची तफावत दूर करावी लागेल. विक्रीच्या बाजारपेठेत आजही शेतकरी भरडला जातोय. त्यामुळे मुक्‍त बाजारपेठ, कमी निर्बंधांची गरज आहे. त्यासाठी कालबाह्य कायद्यांचा नव्याने आढावा घेण्याची गरज आहे, असे मत माजी आयुक्‍त तथा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्‍त केले.

औरंगाबाद येथे गुरुवारी आयोजित गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठीच्या कार्यशाळेच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. इन्स्टिट्यूशन ऑफ अग्रिकल्चरल टेक्‍नॉलॉजिस्ट्‌स इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या समन्वयातून ही एकदिवसीय कार्यशाळा घेतली गेली. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उपस्थिती लाभली. वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, पणनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार, डॉ.आर के गायकवाड, गोकूळचे अरुण नरके, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, डॉ. भगवानराव कापसे, डॉ. सुभाष पाटणे, डॉ. के. एस. मुळें आदींची उपस्थिती होती.

डॉ. दांगट म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या कायद्यामधील सुधारणा अजूनही शेतकऱ्यांपर्यंत गेल्या नाहीत. दुष्काळाचे चक्र भेदण्यासाठी उत्पादन, पणन, निर्यात या विषयांना दुग्धोत्पादनाची जोड द्यावी लागेल.``
डॉ. भापकर म्हणाले, ‘‘दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. शासनानेही मदतीचा हात पुढे करताना मराठवाड्यासाठी १००० गट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामाध्यमातून १००० कोटी रुपये या गटांना मिळणार आहेत.``

‘‘मॉन्सून आणि मार्केटच्या समस्येतून शेतकऱ्यांना बाहेर काढावे लागेल. एकट्याने तो या संकटाचा सामना करू शकणार नाही म्हणून त्याला समूहाने याचा सामना कसा करता येईल हा विषय महत्त्वाचा आहे, असे डॉ. ढवण म्हणाले.

माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, डॉ. भगवानराव कापसे, डॉ. तुकाराम मोटे, विजय चोले, गोविंद हांडे, सुनील पवार, गणेश हिंगमिरे आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

इतर बातम्या
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
निलंगा तालुक्‍यात गुऱ्हाळे सुरूनिलंगा, लातूर ः पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने व...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...