agriculture news in marathi, Remove the demands of farmers; Otherwise the warning of 'Jagar's movement | Agrowon

शेतकऱ्यांच्या मागण्या निकाली काढा; अन्यथा आंदोलनाचा ‘जागर’चा इशारा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

अकोला : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा त्यावर तोडगा काढण्यात अाला नाही. त्यामुळे शासनाने येत्या १५ दिवसांत या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी; अन्यथा अांदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी जागर मंचाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला अाहे.

अकोला : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा त्यावर तोडगा काढण्यात अाला नाही. त्यामुळे शासनाने येत्या १५ दिवसांत या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी; अन्यथा अांदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी जागर मंचाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला अाहे.

मंचाचे प्रशांत गावंडे, मनोज तायडे, जगन्नाथ सरदार, अमोल इंगोले, सतिनश गोपनारायण, अनिल घावट, नीलेश ठोकळ, श्याम राऊत, राजेश गाडगे, पुरुषोत्तम गाडगे, सुनील राऊत, रामकृष्ण मोरे, भारत सरदार, भास्कर वानखेडे, बबनराव सांगळे, दीपक गावंडे, नीलेश अव्हाळे, राजू राऊत अादींनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

मंचाने अांदोलन केले. त्या वेळी प्रशासनाने मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानुसार भावांतर योजना, सोने तारण कर्ज माफी योजना तत्काळ लागू करावी, सर्व शेतकऱ्यांना ओटीसीमध्ये न बसविता फक्त कर्जमाफी करावी, तसे जाहीर करावे, गतवर्षी नाफेडने खरेदी केलेल्या तूर, हरभऱ्याचे चुकारे व्याजासह द्यावे, विलंबाकरिता संबंधितांवर कारवाई करावी, मागील तीन वर्षांतील दुष्काळसदृश परिस्थितीत घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क त्वरित परत करावे, या वर्षी परतीच्या पावसाची शक्यता कमी असून, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन मोहीम राबवावी आदी मागण्या करण्यात अाल्या अाहेत.

इतर बातम्या
अकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला...अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी...
नुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...
शाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम...नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्...
साताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमीसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
भूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...
शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...
सौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...
तूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
केळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...