agriculture news in marathi, remove GST on Soyameal demands poultry industry | Agrowon

सोयामिलवरील जीएसटी मागे घ्यावा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018

नाशिक : शेतीमालावर जीएसटी नसताना सोयामीलवरही तो नसावा. यामुळे लहान-मोठ्या सर्वच पोल्ट्रीधारकांचा उत्पादनखर्च वाढत अाहे. सोयामीलवरील जीएसटी रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रीडर्स असोसिएशनने राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना दिले आहे.

नाशिक : शेतीमालावर जीएसटी नसताना सोयामीलवरही तो नसावा. यामुळे लहान-मोठ्या सर्वच पोल्ट्रीधारकांचा उत्पादनखर्च वाढत अाहे. सोयामीलवरील जीएसटी रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रीडर्स असोसिएशनने राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना दिले आहे.

पोल्ट्री प्रदर्शनाच्या उद्‍घाटनासाठी नुकतेच मंत्री श्री. जानकर येथे आले होते. त्या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार, सचिव डॉ. प्रसन्न पेडगावकर यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि पोल्ट्री उद्योजक श्रीकृष्ण गांगुर्डे, उद्धव आहिरे, राजेंद्र थोरात, अरुण पवार यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी बापू गुंजाळ, मनोज कापसे आदी उपस्थित होते. पोल्ट्री उद्योगाचा प्रमुख कच्चा माल असलेल्या सोयामीलच्या दरात ३४ हजार प्रतिटनापर्यंत वाढ झाली आहे. सध्या सोयामीलवर पाच टक्के जीएसटी आकारला जात असून, त्या माध्यमातून प्रतिटन सुमारे दीड हजार रुपये सोयामील महाग झाले आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे.

निवेदनातील अन्य मागण्या...

  •  बाजार समितीच्या आवाराबाहेर मका खरेदी करणाऱ्या पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना सेस भरण्याच्या नोटिसा पाठवल्या जात आहे. पोल्ट्रीधारक मका उत्पादकांकडून थेट खरेदी करतात. यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याऐंवजी थेट पर्याय उपलब्ध असून, किफायती मोबदला मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीधारकांकडील मका खरेदीवरील सेस आकारणी रद्द व्हावी.
  •  थेट चिकन विक्रीसंदर्भात नगरपंचायती क्षेत्रात आडकाठी केली जात असून, संबंधित यंत्रणांकडून दुकान सुरू करण्यासाठी परवानगी नाकारली जात आहे. महापालिकांप्रमाणेच नगर परिषदा, नगर पंचायती क्षेत्रात थेट चिकन विक्रीसाठी खास झोन उपलब्ध करून द्यावेत.
  •  अनेक पोल्ट्रीधारकांना ग्रामपंचायतींकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. काही सुरू असलेले फार्मदेखील बंद करण्याच्या नोटिसा पाठवल्या जात आहे. याबाबत ठोस नियमावली तयार करावी आणि प्रदूषण नियामक मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने नेमके नियम व अटी जारी करावेत.
  •  तेलंगणा सरकारच्या धर्तीवर राज्याच्या सरकारी गोदामात पडून असलेले धान्य उदा. मका, बाजरी महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगासाठी माफक दरात पुरवावे. आधारभावाने खरेदी केलेला मका योग्य वेळेत थेट पोल्ट्रीधारकांनाच अनुदानित दराने पुरवावा.
  •  लहान व मध्यम शेतकऱ्यांना पोल्ट्रीसाठीच्या खेळत्या भांडवलाकरिता पीककर्जाचा दर्जा मिळावा आणि ते सध्याच्या दहा ते बारा टक्क्यांवरून सहा ते आठ टक्के दराने मिळावे.
  •  औद्योगिक वापरासाठी एकीकडे वीस टक्क्यांची वीज दरवाढ असताना, पोल्ट्रीसाठी मात्र तब्बल ७० टक्क्यांनी दरवाढ केली आहे. ती मागे घ्यावी. शेतीपूरक व्यवसायाचे निकष लावून रास्त दरात वीज द्यावी.

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...