agriculture news in marathi, remove onion export ban permanently demands anil ghanvat | Agrowon

कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय कायमस्वरूपी असावा ः अनिल घनवट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नगर ः केंद्र शासनाचा कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय चांगला आहे. हा निर्णय कायमस्वरूपी असावा. त्यातूनच शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.

नगर ः केंद्र शासनाचा कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय चांगला आहे. हा निर्णय कायमस्वरूपी असावा. त्यातूनच शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.

घनवट यांनी सांगितले, की केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवून अघोषित निर्यातबंदी उठविली आहे. शासनाचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. निर्यात खुली होताच कांद्याचे गडगडणारे दर तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलने वाढले. त्यामुळे कायमस्वरूपी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर शासनाने हा निर्णय कायमस्वरूपी अमलात आणणे गरजेचे आहे. याआगोदर शासनाने अचानक निर्यातबंदी लावून किंवा निर्यातमूल्य वाढवून आंतरराष्ट्रीय कांदा व्यापारात हस्तक्षेप केला होता. त्यामुळे भारताने अांतरराष्ट्रीय बाजारातील आपली विश्वासाहर्ता गमावली होती. ती पुन्हा कमविण्यासाठी कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी थांबला पाहिजे. ग्राहकहितासाठी व शहरी मतदानावर डोळा ठेवून शेतीमाल स्वस्त ठेवण्याचा सर्वच सरकारांचा प्रयत्न असतो; पण त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कांद्याला किमान वीस रुपये प्रतिकिलो विकला तरच शेतकऱ्यांना परवडते.

शासनाने पुन्हा निर्यातबंदी लागू केल्यास किंवा किमान निर्यातमूल्य लादण्याचा प्रयत्न केल्यास त्याचदिवशी शेतकरी पुन्हा रस्त्यावर येतील. बाहेरील देशात भारतापेक्षा स्वस्त कांदा मिळाला तर दहा टक्के आयातकर लावून आयात करायलाही हरकत नाही; पण चढ्या दराने आयात करून शहरातल्या ग्राहकांना स्वस्तात विकण्याचा धंदा शासनाने बंद करावा, असे घनवट म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...