शिक्षक बदल्यांतील त्रुटी दूर करा

शिक्षक बदल्यांतील त्रुटी दूर करा
शिक्षक बदल्यांतील त्रुटी दूर करा

जळगाव : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या पती-पत्नी एकत्रीकरणात गुगल मॅपिंगचे अंतर ग्राह्य धरून करण्यात आल्या. मात्र, या अंतरात त्रुटी असल्याने अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. या त्रुटी दूर करण्यासाठी गुगलऐवजी एसटी महामंडळाचे अंतर ग्राह्य धरण्याच्या सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सीईओंना दिल्या होत्या. तरीही याची अंमलबजावणी होत नसल्याने उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिला.

शिक्षक बदल्यांमध्ये होणारे घोळ टाळण्यासाठी शासनाने ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविली. मात्र, यात अनेकांनी बोगस दाखले सादर करून सोयीची बदली करून घेतली. पती-पत्नी एकत्रीकरणात गुगल मॅपिंगचे अंतर ग्राह्य धरण्याच्या सूचना व्हॉट्‌सॲपवरून देण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश शाळांचे प्रत्यक्ष अंतर हे चुकीचे असल्याने अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. ही बाब जि. प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. धुळे, नगर आणि पुणे जिल्हा परिषदेने गुगल मॅपऐवजी एसटी मार्गाचे अंतर ग्राह्य धरण्याचा ठराव करून घेतला. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातही याची अंमलबजावणी करून या शिक्षकांना एकत्रीकरणाचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

जलसंपदामंत्री महाजन यांनी दिवेकर यांना शिक्षक बदल्यांमध्ये गुगलऐवजी एसटी मार्ग ग्राह्य धरण्याच्या सूचना केल्या होत्या. सभागृह आणि जलसंपदामंत्र्यांच्या सूचनेला जि. प. प्रशासनाने अक्षरशः केराची टोपली दाखविली असल्याचे यावरून दिसून येते. म्हणूनच प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा पल्लवी सावकारे यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com