agriculture news in marathi, rent of paddy warehouse, Maharashtra | Agrowon

धानाचे प्रलंबित गोदाम भाडे द्या : बडोले
मारुती कंदले
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

धान साठवणुकीतील तूटही माफ करण्यात आली असून मिलर्सना दंडनीय रकमेत देण्यात आलेल्या सवलतीप्रमाणे या खरेदी संस्थांनाही दंडातून वगळण्यात आले आहे.

मुंबई ः आधारभूत हमीभाव धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाच्या साठवणुकीसाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे २००९ पासून प्रलंबित असलेले गोदाम भाडे तातडीने देण्यात यावे, असे आदेश सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

विदर्भातील धान उत्पादक पाच जिल्ह्यांतील धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बडोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली होती.

यासंदर्भात माहिती देताना श्री. बडोले म्हणाले, की आधारभूत हमीभाव धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाची साठवणूक करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे २००९ ते २०१६ पर्यंतचे भाडे गोदाम मालकांना मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुढील हंगामात गोदाम भाड्याने देण्यास नकारात्मक भूमिका घेतली होती. गोदाम मालकांना तातडीने प्रलंबित गोदाम भाडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या सहकारी संस्थांनी केलेल्या मुख्य मागण्यांपैकी २०१२ ते २०१५ या कालावधीतील धान साठवणुकीतील तूटही माफ करण्यात आली असून मिलर्सना दंडनीय रकमेत देण्यात आलेल्या सवलतीप्रमाणे या खरेदी संस्थांनाही दंडातून वगळण्यात आले आहे, त्यामुळे धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे श्री. बडोले यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडची सब एजंट म्हणून या सहकारी संस्थांनी खरेदी केलेला धान साठा शासकीय यंत्रणेने ४०-४५ महिने उशिराने उचलल्यामुळे घट येत होती. मात्र त्याची वसूली खरेदी संस्थांच्या कमिशनमधून करण्यात येत होती. त्यामुळे धान खरेदी सहकारी संस्थांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी धानसाठ्याची तूटही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे श्री. बडोले म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
शेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...
‘एमएसीपी’चे फलित काय ?पुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...
एकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...
स्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...
केरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...
वानरांचा बंदोबस्त करणार कसा? माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...
योजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...
क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...
‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...
मॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...
मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...
वर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...