agriculture news in marathi, Repair of debt waiver list | Agrowon

कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती सुरूच
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जानेवारी 2018

जळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन त्रुटी समोर येत असून, दुरुस्तीचे काम सुरूच आहे. हा प्रकार सुरूच राहिला तर दीड लाखावरील कर्जदार शेतकरी ३१ मार्चपर्यंत आपले एनपीए (नॉन पररफॉर्मिंग ॲसेट) खाते कसे नियमित करून घेतील, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

जळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन त्रुटी समोर येत असून, दुरुस्तीचे काम सुरूच आहे. हा प्रकार सुरूच राहिला तर दीड लाखावरील कर्जदार शेतकरी ३१ मार्चपर्यंत आपले एनपीए (नॉन पररफॉर्मिंग ॲसेट) खाते कसे नियमित करून घेतील, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पूर्ण खरीप हंगामात कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज आणि त्यासंबंधीच्या अडचणींमध्ये शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आता रब्बी हंगाम अर्धाअधिक संपत आला आहे, तरीही कर्जमाफीचा घोळ सुरू आहे. हे शेपूट असेच लांबत आहे. जिल्ह्यात अलीकडेच सात हजार लाभार्थी शेतकऱ्यांची दुबार नावे तपासण्यासाठी यलो यादी आली असून, त्यासंबंधी सुनावण्या सुरू झाल्या आहेत.

दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाख रुपयांवर आहे, त्यांना आपले एनपीए खाते ३१ मार्चपर्यंत नियमित करून घेण्याचे निर्देश आहेत. दीड लाख रुपये शासन देईल व उर्वरित रक्कम संबंधित शेतकऱ्याला भरायची आहे. परंतु या योजनेसंबंधी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले, त्यातील अनेकांची नावे ग्रीन यादीत आलेली नाहीत. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. आता जानेवारी महिना अंतिम टप्प्यात येत आहे. पुढे दोन महिने आहेत. या कालावधीतही यलो यादी आणि रेड यादी असा घोळ सुरूच राहिला, तर संबंधित शेतकरी ऑनलाइन अर्ज भरूनही या योजनेपासून वंचित राहतील.

दुसऱ्या बाजूला शासन आम्ही कर्जमाफी दिली; पण शेतकऱ्यांनी लाभच घेतला नाही, असे सांगून मोकळे होईल. परंतु कर्जमाफीच्या यादीमधील घोळ मिटत नसल्याचे स्वीकारायला प्रशासन व शासन तयार नसल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. संबंधित शेतकऱ्याचे नावच ग्रीन यादीत आले नाही, तर तो कर्जमाफीचा लाभ घेणार कसा, असा मुद्दा शेतकरी सचिन चौधरी (आसोदा, जि. जळगाव) यांनी उपस्थित केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...