नुकसानीचा अहवाल शासनाकडे, भरपाईकडे लक्ष

केळीचे नुकसान चोपडा, यावलमध्ये झाले. सुसाट वाऱ्यात केळीचे खांब मोडले. त्यात संबंधित झाडाचे १०० टक्के नुकसान झाले. कारण केळी भुईसपाट झाली, की त्याचा घड कुणी खरेदी करीत नाही. ही बाब लक्षात घेऊन विमाधारकांना नुकसान भरपाई मिळावी. त्याबाबतचे पंचनामे लवकर उरकले जावेत. - संजय चौधरी, केळी उत्पादक, खेडी खुर्द (जि. जळगाव)
नुकसानीचा अहवाल शासनाकडे, भरपाईकडे लक्ष
नुकसानीचा अहवाल शासनाकडे, भरपाईकडे लक्ष

जळगाव : खानदेशात वादळासह अवकाळी पावसाने केळी, बाजरी, आंबा, मका, बिजोत्पादनाचा कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यासंदर्भातील अहवाल तातडीने तयार करून तो शासनाकडे जिल्हा प्रशासनाने दिला आहे. सुमारे ३२५ हेक्‍टरवर नुकसान झाल्याची माहिती आहे. नुकसान भरपाई कशी, केव्हा आणि कुठल्या निकषानुसार जाहीर होणार?, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. 

शेतकऱ्यांनी वादळात जमीनदोस्त झालेल्या केळीसंबंधी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु कंपनीसह प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ७५ गावांमधील २०८ हेक्‍टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले. चोपडा तालुक्‍यातील ४४ गावांमध्ये केळीला फटका बसला. त्याखालोखाल मका पिकाचे २२.७ हेक्‍टर, तर लिंबाचे १३ हेक्‍टर नुकसान झाले. 

ज्या बागेत केळीचे खांब मोडले, तेथे १०० टक्के नुकसान झाले. १५०० झाडांमध्ये १५० ते २०० झाडे मोडल्याचे प्रकार यावल, रावेर, चोपडा व नंदुरबारमधील शहादा, धुळ्यातील शिरपुरात घडले आहेत. यात ज्यांनी विमा संरक्षण घेतले आहे, त्यांनी विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर तक्रार करून पंचनाम्यांची मागणी केली आहे. परंतु अजूनही या भागात विमा भरपाईसंबंधीचे पंचनामे झाले नसल्याची माहिती मिळाली. 

खानदेशात १४ ते १६ एप्रिल यादरम्यान वादळ अधिक झाले. साक्री तालुक्‍यात शेडनेट, पॉलिहाउसला मोठा फटका बसला. यासंदर्भातील नुकसानीसंबंधी शेतकऱ्यांनी विमा कंपनीला सूचना दिली. 

वादळानंतर दोन दिवस प्रशासनाने दखल घेतली नव्हती. परंतु नंतर तलाठ्यांसह तहसीलदारांकडून पंचनामा करण्यात आल्याचा दावा जळगाव जिल्हा प्रशासनाने केला. ७५ गावांतील ४९३ शेतकरी बाधित ठरले आहेत. त्याची माहिती शासनाला सादर केल्याचे सांगण्यात आले. धुळ्यात बिजोत्पादनाचा कांदा, आंबा व बाजरी पिकाचे नुकसान झाले. तर नंदुरबारातही केळी, बिजोत्पादनाचा कांदा व बाजरी, मका पिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com