agriculture news in marathi, report of Male goat exhibition in Akola | Agrowon

मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी करणारे ‘बोकड प्रदर्शन’
गोपाल हागे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने ‘बोकड प्रदर्शन व विक्री’ या सुरू केलेल्या उपक्रमातून मध्यस्थांचा अडसर दूर करीत शेतकऱ्यांना थेट ग्राहक मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचे प्रदर्शनाचे तिसरे वर्ष आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार विविध जातींच्या बोकडांच्या विक्रीतून नऊ लाखांपासून ते १२ लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत या प्रदर्शनाची क्षमता तयार झाली आहे.

अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने ‘बोकड प्रदर्शन व विक्री’ या सुरू केलेल्या उपक्रमातून मध्यस्थांचा अडसर दूर करीत शेतकऱ्यांना थेट ग्राहक मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचे प्रदर्शनाचे तिसरे वर्ष आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार विविध जातींच्या बोकडांच्या विक्रीतून नऊ लाखांपासून ते १२ लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत या प्रदर्शनाची क्षमता तयार झाली आहे.

शेतीची बाजारव्यवस्था मध्यस्थांच्या हातात अाहे. यात शेतकऱ्यालाच अधिक फटका सहन करावा लागतो. मात्र, प्रचलित पद्धतीला छेद देताना अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने यासंबंधीचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवला आहे. विविध यंत्रणांची मदत घेत अकोला येथे ‘बोकड प्रदर्शन व विक्री’ व्यवस्था उभारून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली
आहे.

मध्यस्थविरहीत बाजाराची संकल्पना
संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बिराडे सुमारे १५ वर्षे मुंबईत कार्यरत होते. या वेळी त्यांनी देवनार (मुंबई) मध्ये भरणाऱ्या बोकड बाजाराला अनेकदा भेटी दिल्या.
तेथे महाराष्ट्रातील कमी अाणि अन्य राज्यांतील शेळ्या, बोकड अधिक विक्रीला येत असल्याचा अनुभव त्यांना आला. या बाजारात दर चांगला मिळतो, मात्र राज्यातील पशुपालकांच्या खिशात मात्र त्याचा फायदा पडत नाही हे त्यांनी जाणले. त्यांची बदली अकोला येथे झाली. विदर्भात चांगला शेळीवंश अाहे. मात्र, येथील बाजारपेठ मध्यस्थांच्या हातात असल्याचे दिसून अाले. या भागात छोटासा प्रयत्न म्हणून अापल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यातून बोकड प्रदर्शन व विक्री असा दहा दिवसांचा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले.

कार्यपद्धती अभ्यासली
सुरवातीला ‘अात्मा’ यंत्रणेच्या मदतीने २० शेतकऱ्यांचा गट मुंबई बाजारात अभ्यासासाठी पाठवला. त्याने येथील कार्यपद्धती अभ्यासली. त्यानंतर २०१६ मध्ये अकोल्यात पहिल्या बोकड प्रदर्शन व विक्री या उपक्रमाची सुरवात झाली. यासाठी अात्मा, पशुसंवर्धन विभाग दरवर्षी सहकार्य करीत अाहे.

दरवर्षी वाढता प्रतिसाद
यंदाच्या तिसऱ्या वर्षीचे प्रदर्शन अकोला येथे भरले असून, ते २० अाॅगस्टपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात जातिवंत बोकड पाहायला मिळत आहेत. शिवाय ग्राहकांनाही खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. यानिमित्ताने पशुपालकांसाठी नवी बाजार व्यवस्था तयार होत अाहे.

प्रदर्शनातील मागील अनुभव

  • सन २०१६ मध्ये या प्रदर्शनात १२ ते १३ लाख रुपयांची उलाढाल
  • मागील वर्षी सुमारे ११० बोकडांची विक्री. त्यातून ९ लाख ३५ हजार रुपयांची उलाढाल
  • यंदाही पहिल्याच दिवसापासून चांगला प्रतिसाद. अकोला, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाड्यातूनही शेळीपालकांचा यात सहभाग
  • जमुनापरी, जमुनापरी क्रॉस, स्थानिक, सोजत, बेरारी, बोअर क्रॉस अशी प्रदर्शनात विविधता
  • एक वर्ष ते अडीच वर्षे वयाच्या आतील बोकडांची प्रदर्शनात विक्री. तीस ते ६० किलोपर्यंत त्यांचे वजन

शेतकरी, ग्राहक- दोघांनाही फायदा
प्रदर्शनात व्यवहारासाठी कुठलाही मध्यस्थ नसतो. पशुपालक व ग्राहक अशा दोघांच्या चर्चेतूनच दर ठरवला जातो. यंदा पहिल्याच दिवशी ३१० रुपये प्रतिकिलो दराने बोकडाची विक्री झाली. एका शेतकऱ्याकडील ७२ किलो वजनाचे दोन बोकड सुमारे २२ हजार ३२० रुपयांना विक्री झाले. देखणा, रुबाबदार, निरोगी बोकडांना दर अधिक मिळतो असा मागील अनुभव लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी बोकडांचे संगोपन केले व विक्रीस अाणले. इथे होणारे व्यवहारदेखील अधिकृत असून, बाजार समितीद्वारे त्याची नोंद घेत पावतीही दिली जाते.

प्रशिक्षणाची सोय
पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत शेळीपालन विषयातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणे घेतली जातात. त्यात शिकवले जाणारे बारकावे फायदेशीर ठरत असल्याचे संस्थेचे डाॅ. एस. एम. वानखडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
मागील सात वर्षांपासून शेळीपालन करीत अाहे. हे प्रदर्शन सुरू झाले तेव्हापासून दरवर्षी त्यात सहभागी होत अाहे. मागील वर्षी माझा एक बोकड सर्वाधिक १८ हजार रुपयांत या ठिकाणी विकला. चांगल्या बोकडांना दरही चांगले मिळतात. येथे मध्यस्थ नसल्याने मी संगोपन केलेल्या बोकडाची किंमत स्वतः ठरवू शकतो. अन्य बाजारांत जेव्हा बोकड विक्रीला घेऊन जातो, त्या वेळी मध्यस्थ माझ्याबरोबरच खरेदीदाराकडूनही मध्यस्थी घेतो. यामुळे शेतकरी व खरेदीदार असे दोघांचेही नुकसान होत असते.

-रामकृष्ण अंभोरे, शिवणी खदान, जि. अकोला

मी संबंधित संस्थेत शेळी व पोल्ट्री फार्म विषयातील दोन वर्षांचा डिप्लोमा केला अाहे. माझ्या ज्ञानाचा उपयोग नोकरीसाठी न करता स्वतः व्यवसाय करण्यासाठी ठरविले. शेळीपालनातले प्रशिक्षण घेतल्यानंतर दीड वर्षापासून या व्यवसायास दोन शेळ्यांपासून सुरवात केली. सध्या माझ्याकडे ७० पर्यंत शेळ्यांची संख्या अाहे. अकोला येथील हे प्रदर्शन मी पूर्वीही पाहिले होते. या वर्षी बोकड विक्रीसाठी अाणले आहेत. त्यांची किंमत मला ठरवता येते ही कल्पनाच सुखावणारी अाहे.

--मैना राजेश काळे, औंढानागनाथ, जि. हिंगोली.

शेळीपालकाला तंत्रज्ञानासोबतच बाजारपेठ देणे, मध्यस्थांचा अडसर दूर करणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट अाहे. विदर्भात देखणे, तंदुरुस्त बोकड उपलब्ध अाहेत. त्यांचे व्यवस्थापन मात्र चांगल्या प्रकारे करायला हवे. असे झाल्यास इथल्या शेतकऱ्यांचे अार्थिक चित्र पालटू शकते.

-डॉ. हेमंत बिराडे, अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला
संपर्क- ७०२११२८२७४

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...