agriculture news in Marathi, rescue operation on mission mode in Kerla, Maharashtra | Agrowon

केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य
सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुट्टनाड आणि अलेप्पी या जिल्ह्यांमधून शनिवारी आणि रविवारी सुमारे २.५ लाख लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्यात आले असून, जवळपास ९ लाख लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. 

तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुट्टनाड आणि अलेप्पी या जिल्ह्यांमधून शनिवारी आणि रविवारी सुमारे २.५ लाख लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्यात आले असून, जवळपास ९ लाख लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. 

कुट्टनाड आणि अलेप्पी या दोन्ही जिल्ह्यांमधील पाण्याची पातळी अजूनही कमी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने ९७ टक्के लाेकांना अलाप्पुझालामधील मदत छावण्यांमध्ये आणण्यात आले असल्याचा दावा केला आहे. मुख्य शहर अजूनही पाण्याखाली आहे. परिसरातील घरे पाण्यानी भरलेली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, सुमारे तीन लाख लोक प्रभावित झाली असून, राज्यातील विविध शिबिरांमध्ये ९ लाख लोक आहेत. कुट्टनाडमधील लोकांच्या बचावासाठी अलाप्पुझामधून ६० बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. 

बचाव पथके सातत्याने लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मदतकार्यात अडथळे येत असल्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना अन्न आणि पाणी मिळणे कठीण झाले आहे. चेंगन्नूर भागात अजूनही १० हजार लोक अडकून पडले आहेत. एक बहुमजली इमारतीमध्ये अनेक मृतदेह असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. मात्र, पाणीपातळी ओसरल्यानंतर ते बाहेर काढले जातील, असे सांगितले जात आहे.

बचाव पथके आणि हेलिकॉप्टर्स अन्न पोचविण्याची व्यवस्था करत आहेत. काही भागात मच्छीमारांनीही मदतीसाठी बोटींसह धाव घेतली आहे. पेरियार नदीच्या काठावर अनेक गायी, म्हैशी आणि शेळ्या मरून पडल्याचे भयंकर दृष्य दिसत आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

राष्ट्रपतींनी घेतला आढावा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्यपाल पी. सदाशिवम आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रपती भवनने ट्विट करून म्हटले आहे, की राष्ट्रपतींनी अडचणींचा सामना करणाऱ्या केरळच्या लोकांची क्षमता आणि धैर्याची स्तुती केली. त्यांनी राज्यातील जनतेला विश्‍वास दिला, की संपूर्ण देश त्यांच्याबरोबर आहे. 

पुराचे संकट... 

  • हजारो लोक अजूनही सुरक्षितस्थळी पोचण्याच्या प्रतीक्षेत 
  • गेल्या दहा दिवसांत १९७ जण मृत्युमुखी 
  • उत्तर प्रदेश सरकारकडून १५ कोटींचे बचाव साहित्य आणि औषधे 
  • पश्‍चिम बंगाल सरकारकडून दहा कोटींची मदत 
  • २० हजार कोटींच्या नुकसानीचा असोचॅमचा अंदाज

इतर अॅग्रो विशेष
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...