कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी

शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज घेऊन माहिती संकलित करण्याचे काम होते. संकलित केलेली माहिती संबंधित बॅंका आणि सहकार विभागाला दिली आहे. त्यामुळे महाऑनलाइनकडे आता कर्जमाफी योजनेची कोणतीही माहिती शिल्लक नाही. - शशिकांत इगवे, जिल्हा व्यवस्थापक, महाऑनलाइन महाऑनलाइन जिल्हास्तरावर तरी आम्हाला शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कर्जाची माहिती दिलेली नाही. कर्जमाफी योजनेत शासनाने जाहीर केलेल्या ११ व्या, १२ व्या आणि १३ व्या ग्रीनलिस्टमध्ये शेतकरी वैयक्तिक घटक मानून लाभ दिल्याचे ऐकिवात आहे. - अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी

सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही सरकार विरोधी नाराजीची प्रमुख कारणे मानली जात आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. व्यक्ती ऐवजी कुटुंब हा निकष भाजप सरकारने लावल्याने शेतकऱ्यांमधील नाराजी दूर झाली नाही. धोरणात बदल करत सरकारने कुटुंब ऐवजी व्यक्ती घटक मानून या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये घेतला. परंतु या कर्जमाफीबाबत सहकार, महाऑनलाइन आणि बॅंका यांच्यामध्ये कमालीची उदासीनता दिसत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. अत्यंत किचकट आणि सुरवातीपासून शेवटपर्यंत गोंधळात टाकणारी प्रक्रिया या योजनेत असल्याने त्यातून सरकारबद्दल असलेली नाराजी अधिकच वाढली आहे. महाऑनलाइन, राष्ट्रीयकृत बॅंका आणि सहकार विभाग यांच्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकवाक्‍यता नसल्याने या योजनेबद्दल गोंधळाची स्थिती बघायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत शेतकरी कर्जाचा विषय महत्त्वाचा ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत देखील कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा ठरणार असल्याने कर्जमाफीबद्दलची नाराजी भाजप सरकारला डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com