agriculture news in marathi, Resentment to the farmers due to freeze the loan waiver process | Agrowon

कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 डिसेंबर 2018

शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज घेऊन माहिती संकलित करण्याचे काम होते. संकलित केलेली माहिती संबंधित बॅंका आणि सहकार विभागाला दिली आहे. त्यामुळे महाऑनलाइनकडे आता कर्जमाफी योजनेची कोणतीही माहिती शिल्लक नाही.
- शशिकांत इगवे, जिल्हा व्यवस्थापक, महाऑनलाइन

महाऑनलाइन जिल्हास्तरावर तरी आम्हाला शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कर्जाची माहिती दिलेली नाही. कर्जमाफी योजनेत शासनाने जाहीर केलेल्या ११ व्या, १२ व्या आणि १३ व्या ग्रीनलिस्टमध्ये शेतकरी वैयक्तिक घटक मानून लाभ दिल्याचे ऐकिवात आहे. 
- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक

सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही सरकार विरोधी नाराजीची प्रमुख कारणे मानली जात आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. व्यक्ती ऐवजी कुटुंब हा निकष भाजप सरकारने लावल्याने शेतकऱ्यांमधील नाराजी दूर झाली नाही. धोरणात बदल करत सरकारने कुटुंब ऐवजी व्यक्ती घटक मानून या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये घेतला. परंतु या कर्जमाफीबाबत सहकार, महाऑनलाइन आणि बॅंका यांच्यामध्ये कमालीची उदासीनता दिसत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. अत्यंत किचकट आणि सुरवातीपासून शेवटपर्यंत गोंधळात टाकणारी प्रक्रिया या योजनेत असल्याने त्यातून सरकारबद्दल असलेली नाराजी अधिकच वाढली आहे. महाऑनलाइन, राष्ट्रीयकृत बॅंका आणि सहकार विभाग यांच्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकवाक्‍यता नसल्याने या योजनेबद्दल गोंधळाची स्थिती बघायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत शेतकरी कर्जाचा विषय महत्त्वाचा ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत देखील कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा ठरणार असल्याने कर्जमाफीबद्दलची नाराजी भाजप सरकारला डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे.

इतर बातम्या
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
शेतीपिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे ः...पुणे ः पाणी ही संपत्ती आहे; पण ती मोजली जात नाही...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
पाणीटंचाईच्या कामांनाही आचारसंहितेची झळभंडारा ः उन्हाच्या झळांसोबतच पाणीटंचाईचे संकटही...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...