agriculture news in marathi, Reservoirs of water bodies continue to decline | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात जलाशयात पाणीसाठ्यात घट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील लघू मध्यम, मोठ्या प्रकल्पांच्या जलशयातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा यामुळे घट सुरू असल्यामुळे पाणीटंचाईचे सावट दिवसागणिक गडद होत चालले आहे.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील लघू मध्यम, मोठ्या प्रकल्पांच्या जलशयातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा यामुळे घट सुरू असल्यामुळे पाणीटंचाईचे सावट दिवसागणिक गडद होत चालले आहे.

नांदेड जिल्ह्यातील ९ लघू प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. दोन तलाव कोरडे पडले आहेत. सहा तलावांतील उपयुक्त पाणीसाठा १० टक्केपेक्षा खाली गेला आहे. लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६१.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४४.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६१.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.

देगलूर, मुखेड, लोहा तालुक्यातील लघू प्रकल्पांच्या तलावातील पाणीसाठा झपाट्याने घट होत आहे. देऊळगाव, चांडोळा, हणेगाव १, हणेगाव २, उंद्री-मांजरी, आडगाव, वझरा, दापकी या तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. दहा टक्केपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा असलेल्या तलावांमध्ये भेंडेवाडी, मुखेड, आखरगा, जामखेड, वसुर, सलगरा या सहा तलावांचा समावेस आहे. बोमनाळी आणि मोहिना परंडा तलाव कोरडे पडले आहेत.

रविवारी (ता. २८) पैठण येथील जायकवाडी प्रकल्पामध्ये ३१ टक्के, येलदरी धरणामध्ये ९.०८ टक्के, सिद्धेध्वर धरणामध्ये १८.८७ टक्के, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पामध्ये १९.२३ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ६४ टक्के, मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये ४ टक्के, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ५६.९१ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ४८.२१ टक्के, ढालेगाव बंधाऱ्यामध्ये ५०.४१ टक्के, मुळी बंधाऱ्यामध्ये २.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

भूजलपातळी खोल गेली
परभणी जिल्ह्यातील २२ लघू तलावांमध्ये सरासरी ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ७९.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सर्वच प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठ्यामध्ये घट सुरू आहे. भूजल पातळी खोल गेली आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहेत.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...