agriculture news in Marathi, residue free pomegranate has high rates in export, Maharashtra | Agrowon

निर्यातीमध्ये ‘रेसिड्यू फ्री’ डाळिंबालाच उठाव : गोविंद हांडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

डाळिंब संघ अधिवेशन

पुणे ः डाळिंबाच्या निर्यातीसाठी अनारनेट नोंदणी आवश्‍यक आहे. त्याशिवाय युरोपियन देशांमध्ये डाळिंब खरेदी होत नाही. डाळिंबाच्या गुणवत्तेची या देशांतील ग्राहक हमी मागतात. त्यात आता रेसिड्यू फ्री डाळिंबाची मागणी वाढली आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार आपण रेसिड्यू फ्री उत्पादन घेतल्यास निर्यातीमध्ये मोठा वाव मिळू शकतो, असे मत कृषी आयुक्तालयातील तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी शनिवारी (ता. ६) व्यक्त केले. 

डाळिंब संघ अधिवेशन

पुणे ः डाळिंबाच्या निर्यातीसाठी अनारनेट नोंदणी आवश्‍यक आहे. त्याशिवाय युरोपियन देशांमध्ये डाळिंब खरेदी होत नाही. डाळिंबाच्या गुणवत्तेची या देशांतील ग्राहक हमी मागतात. त्यात आता रेसिड्यू फ्री डाळिंबाची मागणी वाढली आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार आपण रेसिड्यू फ्री उत्पादन घेतल्यास निर्यातीमध्ये मोठा वाव मिळू शकतो, असे मत कृषी आयुक्तालयातील तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी शनिवारी (ता. ६) व्यक्त केले. 

अखिल महाराष्ट्र डाळिंब संघाच्या वार्षिक अधिवेशनात श्री. हांडे यांनी निर्यातीकरिता अनुसरावयाची कार्यपद्धती या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

श्री. हांडे म्हणाले, की डाळिंबाच्या उत्पादनामध्ये भारताचा वाटा जवळपास ४६ टक्के आहे. त्याशिवाय इराण ३७ टक्के, स्पेन, तुर्की, अफगाणिस्तान १५ टक्के असे प्रमाण आहे. त्यावरून भारत हा डाळिंब उत्पादनातला आघाडीवरचा देश आहे, हे लक्षात येते. साहजिकच, जगभरातील बाजारपेठ किती मोठ्या प्रमाणात भारताला मिळू शकते, हे लक्षात येईल. पण, निर्यातीमध्ये अजूनही आपण कमी पडतो आहोत. त्यामुळे डाळिंबाचे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे आवश्‍यक आहे.

निर्यातीमध्ये फूड सेफ्टीला महत्त्व आहे, त्यासाठी गॅप सर्टिफिकेट आवश्‍यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी समूहाने एकत्र येण्याची आणि रेसिड्यू फ्री डाळिंबाचे उत्पादन, मार्केटिंग करण्याची गरज आहे. निर्यातीमध्ये मुख्यतः डाळिंबाचा रंग, आकार आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्यायला हवी, निर्यातक्षम देशांत त्याला महत्त्व आहे.

या वेळी श्री. हांडे यांनी निर्यातीसाठी सरकारचे प्रयत्न, योजना आणि संधी या अनुषंगाने तांत्रिक माहितीही सांगितली. परभणी कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनीही या वेळी ‘डाळिंबाच्या देशांतर्गत बाजारपेठा, निर्यात आणि प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. वासकर यांनी डाळिंबावरील प्रक्रिया पदार्थांचीही माहिती दिली. तसेच, प्रक्रियेतील काही तांत्रिक बाबीही समजावून सांगितल्या.

श्री. हांडे म्हणाले...

  •  उत्पादनातील बारकावे लक्षात घेऊन काम करा
  •  डाळिंबाच्या मार्केटिंग, ब्रँडिंगवर भर द्या
  •  रेसिड्यू फ्री डाळिंबाचे उत्पादन वाढवा
  •  सर्व शेतकऱ्यांची अनारनेटमध्ये नोंदणी आवश्‍यकच
  •  निर्यातीसाठी गॅप सर्टिफिकेशन आवश्‍यक
     

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...