agriculture news in marathi, Resignation of VC Dr. Tapas Bhattacharya Dapoli accepted | Agrowon

कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर मंजूर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. नव्या कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी लवकरच शोध समितीची घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. नव्या कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी लवकरच शोध समितीची घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भट्टाचार्य यांच्या कामाची पद्धत काही जणांना आवडत नव्हती. त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करून राज्यपालांकडे जाण्याची तयारी विद्यापीठातील एक गट करीत होता. तथापि, आपल्याला वादात नव्हे, तर कामात रस असल्याचे स्पष्ट करीत डॉ. भट्टाचार्य यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. डॉ. भट्टाचार्य यांनी एप्रिलमध्येच राजीनाम्याची तयारी केली होती. तथापि, कोकण कृषी विद्यापीठात महत्त्वाची संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे ते थांबले होते. एक जूनला त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवून पद सोडण्यासाठी तीन महिन्यांची नोटीस दिली होती. 

‘‘राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी दहा दिवस त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला नव्हता. मात्र, राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी चर्चा करून राजीनामा मंजूर झाल्याचे कुलगुरूंना कळविण्यात यावे, अशी सूचना श्री. राव यांनी श्री. रेड्डी यांना केली. त्यानुसार ११ जून रोजी सचिवांनी एक पत्र काढून राजीनामा मंजूर केल्याचे डॉ. भट्टाचार्य यांना कळविले’’, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव बिजय कुमार यांनादेखील डॉ. भट्टाचार्य यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे कळविण्यात आलेले आहे. ‘‘राज्यातील चार कृषी विद्यापीठांपैकी तीन कुलगुरू राज्याबाहेरील होते तर एक कुलगुरू अनिवासी भारतीय होता. त्यामुळे विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांमध्ये असंतोष खदखदतो आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

कुलगुरू निवडीत मराठी शास्त्रज्ञांवर अन्याय होत असल्याची उघड भूमिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेच्या दरम्यान घेण्यात आली. त्यातून काही जणांनी थेट राज्यपालांकडे देखील तक्रार केली होती. कुलगुरू निवडीसाठी वारंवार बदलले जात असलेले निकषदेखील संशयास्पद ठरत आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...