agriculture news in marathi, Resistance to Malagaonkar's industrial estate land acquisition | Agrowon

माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनास विरोध
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक एकसाठी एका माजी मंत्र्यासह बड्या उद्योजकाच्या दबावामुळे जमिनीचे भूसंपादन केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन न देण्याबाबत शेतकऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक एकसाठी एका माजी मंत्र्यासह बड्या उद्योजकाच्या दबावामुळे जमिनीचे भूसंपादन केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन न देण्याबाबत शेतकऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

संपादित करण्यात येणाऱ्या १५६ हेक्टर क्षेत्रातील जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. तथापि, शासनाने प्रतिएकरी ४६ लाख रुपये भाव देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी तब्बल 25 कोटी रुपये एकरी दराची मागणी लावून धरली आहे. नाशिकच्या नियोजन भवनातील बैठकीस जिल्हाधिकिारी बी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी महेश पाटील, औद्योगिक वसाहतीच्या विभागीय अधिकारी हेमांगी पाटील, माळेगाव येथील शेतकरी अशोक घुगे, विष्णू सांगळे, शरद सांगळे, सदाशिव सांगळे, माधव सांगळे, पांडुरंग सांगळे, निवृत्ती सांगळे आदी शेतकरी उपस्थित होते.

एमआयडीसाठी जमिनी घेताना शासनातर्फे या मिळकतींच्या किमती ठरविण्यास अथवा भूसंपादनास ठाम विरोध केला. कोणत्याही मिळकतीसंदर्भात न्यायालयाच्या पुढील आदेशाशिवाय कोणतीही कारवाई करू नये, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भविष्याचा विचार करूनच उर्वरित जमिनी वगळल्याचा त्यांचा आरोप आहे. घरे, गोठे, विहिरी आदी मालमत्तेच्या गुंतवणुकीच्या दहा पट रक्कम मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रत्येकी दोन युवकांना विकसित प्लॉट विनामूल्य द्यावेत, दोघांना शासकीय अथवा बहुराष्ट्रीय कंपनीत कायमची नोकरी द्यावी, उद्योगधंद्यासाठी शासनामार्फत कर्ज उपलब्ध करू द्यावे, अशा मागण्या लेखी स्वरूपात करण्यात आल्या.

परिसरात उद्योगधंदे वाढल्याने भरभराट होऊन विकास होईल. त्यासाठी जमिनी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले. तालुक्यात समृद्धी महामार्गालत टाऊनशीप विकसित करण्यात येणार आहे. शिवाय तालुक्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे नियोजन आहे. विशेष आर्थिक क्षेत्रही आहे. तेथील जमिनी शासनाने घ्याव्‍यात, असे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...