agriculture news in marathi, resurvey will be done says Minister Bavankule | Agrowon

पाटील कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देणार : बावणकुळे
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागपूर : धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्‍टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जमिनीचे फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर पाटील यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देण्यात येईल, असे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार (ता. २९) दिले. तत्कालीन प्रशासनाने केलेल्या घोळामुळे हा प्रश्न निर्माण झाला. यास ते जबाबदार आहेत, असे मंत्री बावणकुळे म्हणाले.

नागपूर : धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्‍टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जमिनीचे फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर पाटील यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देण्यात येईल, असे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार (ता. २९) दिले. तत्कालीन प्रशासनाने केलेल्या घोळामुळे हा प्रश्न निर्माण झाला. यास ते जबाबदार आहेत, असे मंत्री बावणकुळे म्हणाले.

औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातील मोजे विखरण येथील जमिनी संपादित केली होती. यात धर्मा पाटील यांच्याही जमिनीचा समावेश होता. त्यांच्या दोन हेक्‍टर बागायती जमिनीसाठी चार लाख तीन हजार रुपयांचा मोबादला देण्यात आला होता. हा मोबदला अत्यंत अल्प असून शेजारच्या जमिनींना कोट्यवधी रुपये दिल्याचे धर्मा पाटील यांचे म्हणणे होते. यात मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला असून, दलालांच्या जमिनींना जादा मोबदला देण्यात आल्याचे त्यांचे म्हणने होते. अत्यल्प मोबदला दिल्याने धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या दारात २२ जानेवारीस विष प्राशन केले होते. रविवारी (ता. २८) रात्री त्यांचे निधन झाले. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून, ऊर्जामंत्र्यांनी तातडीने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त माहिती दिली. 

सानुग्रह अनुदान धर्मा पाटील यांच्या जमिनीसह अन्य जमीनधारकांना देता येईल का? याची चाचपणी करण्याकरिता अहवाल मागितला आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन २००९ ते २०१५ या काळात झाले असून, त्याच काळात पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगून याला काँग्रेसला जबाबदार धरले. या वेळी फेरमूल्यांकनाचे लेखी आश्वासनही त्यांनी दिले. 

जमिनीचे चुकीचे फेरमूल्यांकन झाल्याने मोबदला कमी मिळाल्याची पाटील यांची तक्रार होती. त्याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करत आहे. येत्या सात दिवसांत चौकशी पूर्ण होईल. १९९ हेक्‍टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात येईल.
- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...