agriculture news in marathi, return monsoon journey from 28 september | Agrowon

मॉन्सून २८ पासून परतीच्या मार्गावर
संदीप नवले
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

यंदा परतीच्या पावसास थोडा उशीर झाला असला, तरी येत्या 28 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होण्याचे संकेत आहेत.
- ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे

पुणे : सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर ओसरला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत या सर्व भागांत थांबल्यानंतर साधारणपणे 28 सप्टेंबरपासून परतीचा (नॉर्थ वेस्ट) प्रवास सुरू होण्याची शक्‍यता आहे.

यंदा 18 सप्टेंबरनंतर पोषक हवामान झाल्यास परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज होता. परंतु या कालावधीत पाऊस पडत असल्यामुळे यंदा मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजस्थानच्या पश्‍चिम भागातील पाऊस थांबल्यानंतर पाच दिवस आधी म्हणजेच रविवारी (ता. 24) परतीच्या पावसाचा अंदाज दिला आहे.

सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असून, कमाल तापमानात घट होण्यास सुरवात झाली आहे. देशात साधारणपणे एक सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास होण्याचा अंदाज असतो. गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी देशाच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. काही ठिकाणी हलका स्वरूपाच्या सरीही बरसत होत्या. परंतु ही स्थिती कमी झाली आहे.

तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, उत्तराखंड, गुजरात, झारखंड या भागांतही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे परतीच्या पावसाच्या अनुकूल स्थिती तयार झाली आहे. देशात परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. त्या वेळी राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या भागांतील पाऊस पडण्याचे थांबलेले असते. त्या वेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढलेले असतात.

तर दक्षिणेकडील हवेचे दाब कमी असतात. त्याच वेळी ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतात. टप्प्याटप्प्याने हे वारे दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे अनेक भागांत जोरदार पाऊस होतो. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागांतही परतीचा चांगला पाऊस पडतो.

कोकणात परतीचा पाऊस कमी होतो. दक्षिणेकडील तमिळनाडूच्या भागात हा परतीचा पाऊस नोव्हेंबर, डिसेंबरपर्यत सुरू असतो. गेल्या दहा वर्षांतील पावसाचा परतीचा प्रवास लक्षात घेतला असता, 2013 मध्ये नऊ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर 2015 मध्येही चार सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता.
 

वर्षनिहाय परतीच्या मॉन्सूनची तारीख (सप्टेंबरमधील)
तारीख 24 9 23 4 15 28 (अंदाज)
वर्ष 2012 2013 2014 2015 2016 2017

 

इतर अॅग्रो विशेष
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...