agriculture news in marathi, return monsoon, pune | Agrowon

विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून मॉन्सून परतला
संदीप नवले
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसाने अखेर रविवारी (ता.15) राज्यातील विदर्भ आणि खानदेशातील काही भागांतून माघार घेतली आहे. चार ते पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रविवारी पुण्यासह राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसाने अखेर रविवारी (ता.15) राज्यातील विदर्भ आणि खानदेशातील काही भागांतून माघार घेतली आहे. चार ते पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रविवारी पुण्यासह राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

गेल्या वर्षीही 15 ते 27 सप्टेबर या कालावधीत परतीच्या पावसास सुरवात झाली होती. त्यानंतर सतरा ते अठरा दिवस टप्प्याटप्प्याने वाटचाल करत अखेर 14 ते 15 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने माघार घेतली होती. यंदाही पावसाने माघार घेण्यास सुमारे 17 ते 18 दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली. गेल्या 27 सप्टेंबरपासून राजस्थानच्या पश्‍चिम भागातून परतीच्या पावसास सुरवात झाली होती.

त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी हा परतीचा पाऊस उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात या भागात दाखल झाला होता. दहा ऑक्‍टोबरला याच भागात थांबत बहुतांशी ठिकाणी हा पाऊस पडला; परंतु 11 ऑक्‍टोबरला पुन्हा हळूहळू पुढे मार्गक्रमण करत 14 ऑक्‍टोबरपर्यंत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या अनेक भागांत परतीचा पाऊस दाखल झाला होता. या काळात उत्तरेकडील अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला.

सध्या परतीच्या पावसास माघारी जाण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विदर्भातील काही भाग, मराठवाडा व खानदेशातील काही भागांतून पावसाने माघार घेतली. मात्र, दोन ते तीन दिवसांत देशातील सर्वच भागातून पाऊस माघारी फिरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. चार ते पाच दिवस राज्यातील काही भागांत हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेयं
सध्या बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत आहे. हे तीव्र होत असलेले क्षेत्र उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे राज्यात शुक्रवारपासून (ता.20) पुन्हा हवामानात चढ-उतार राहणार असून, बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव...सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय...
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडतराहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या...
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात...गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी...
देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये...
विदर्भात अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या...
आज आषाढी एकादशीपंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण ।...
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीतपुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना...
तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळीअकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड...
साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्यनवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर...
आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद लातूर  : पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन...
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे...
बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा...परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (...
दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारकपुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या...
पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकनपुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी...
पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।। ...
शेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...