agriculture news in Marathi, return monsoon rain spoiled diwali happiness, Maharashtra | Agrowon

दिवाळीच्या उत्साहावर परतीच्या पावसाचे पाणी
राजकुमार चौगुले
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

ढगाळ हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच परतीच्या पावसाने सगळी द्राक्षशेतीची संकटात आली. यामुळे यंदाचा हंगामच वाया गेल्याची स्थिती आहे.
- विनायक माळी, कवठेमहांकाळ

कोल्हापूर : मॉन्सूनच्या पहिल्या टप्प्यात पाऊस हवा म्हणून आम्ही धावा केला आणि अखेरच्या टप्प्यात मात्र पाऊस थांबावा म्हणून वाट पहातोय. गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने खरिप भाताची काढणीच संकटात आलीय. नुकसान टाळण्यासाठी कच्या वाफशातच भाताची काढणी सुरू आहे. उत्पन्नात घट निश्‍चित आहे. या वातावरणात दिवाळीची खरेदी सुरू आहे, पण त्यात उत्साह नाही. डोळ्यासमोर पावसामुळ भात नुकसानीची शक्‍यता उदविग्न करत असल्याची प्रतिक्रिया कोथळी (ता. करवीर) येथील प्रगतिशील शेतकरी आनंदराव पाटील यांनी व्यक्त केली. 

तसे पहायला गेले तर श्री. पाटील हे साडेसात एकरांचे प्रयोगशील शेतकरी. यामध्ये फळपिकासह ऊस, भात व मत्स्य शेतीही त्यांनी केली आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण पिकांमुळे त्यांना शेतीत फारसे नुकसान सोसावे लागत नाही. घरचा पुरता भात होतो. तो काढला की इतर पिके घेतली जातात. आताही भात काढणीच्या अवस्थेत आहे. पण भाताच्या शिवारातच जाणे अशक्‍य आहे. रोज पडणारा पाऊस उदविग्न करीत आहे. ज्या दिवाळीत रब्बीची धामधूम असायची त्याच दिवाळीत आता खरिपाच्या काढणीसाठी पाऊस थांबायचा धावा करावा लागत आहे. आनंदरावांची ऊस शेतीही आहे. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी आडसाली लावण केली आहे. पुरेसा सूर्यप्रकाश आहे. पण जमिनीतले पाणी हटायला तयार नाही. पाणी काढल्याशिवाय उसाची वाढ अशक्‍य आहे. आता हे पाणी काढायचे कसे व ऊस शेती जगवायची कशी याच चिंतेने प्रयोगशील असणाऱ्या आनंदरावांनीही चिंताग्रस्त केले. 

श्री. पाटील हे गावातील संस्थेची संबंधित आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही थेट संवाद साधला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी किती चांगल्या प्रकारे कर्जमाफी होईल हे सांगितले. पण प्रत्यक्षात गावी मात्र मोठी विचित्र अवस्था असल्याचे त्यांचे मत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातच्या सोसायट्यांमध्ये बहुतांशी करून ऊस उत्पादकांचे कर्ज असते. पण कालावधीच्या बाबतीत गोंधळ असल्याने प्रत्यक्षात फक्त दहा ते पंधरा टक्के लोकांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्‍य नसल्याचे आनंदराव सांगतात.

म्हणजे इतकी ढोलवाजवून प्रसिद्धी केली जात आहे त्याचा ऊस पट्ट्यातल्या शेतकऱ्याला किती लाभ होत असेल याचे चित्र आनंदरावाच्या बोलण्यातून लक्षात येते. एकूण परतीचा पावसाने उडविलेली दाणादाण, कर्जमाफीबाबतचे असमाधानकारक चित्र, खरिपाची चिंता या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्याची दिवाळी फारशी उत्साहवर्धक नसल्याचेच दृष्य आहे. 

द्राक्षबागेच्या नुकसानीने हिरावला दिवाळीचा आनंद
अलीकडच्या काळात सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्‍यात द्राक्ष शेती वाढत आहे. दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्‍यातील विनायक माळी यांचाही आनंद ऐन दिवाळीच्या अगोदर पावसाने हिरावून घेतला. सप्टेंबरला छाटणी झाल्यानंतर यंदाचा हंगाम साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्री. माळी यांना पहिल्यांदा ढगाळ हवामानाचा फटका बसला. यामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच परतीच्या पावसाने सगळी द्राक्षशेतीची संकटात आली. यामुळे यंदाचा हंगामच वाया गेल्याची स्थिती आहे. बहुतांशी द्राक्षबागात पाणी साचल्याने नुकसान अटळ बनले आहे. यामुळे बागायतदारांच्या उत्साहवर पाणी परसले आहे.
 

इतर बातम्या
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
सांगली जिल्ह्यात धग वाढतेयसांगली : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही दूध दराच्या...
हरभऱ्याचे चुकारे अद्याप थकीतनांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...