परतीचा पाऊस ठरेल दिलासादायक
संदीप नवले
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

परतीचा पाऊस जेव्हा सुरू होतो, त्या वेळी वातावारणामध्ये काही ठिकाणी पाऊस थांबतो. काही ठिकाणी तापमान वाढून उकाडा वाढण्यास सुरवात होते. तसेच हवेचे दाबही वाढलेले असतात.
- ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे

पुणे ः राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यंदा हा परतीचा पाऊस दिलासादायक ठरण्याचे संकेत आहेत.

परतीच्या पावसाच्या वेळी वातावरणात विविध बदल घडत असतात. या बदलामध्ये काही ठिकाणी हवेचे दाब वाढतात, तर काही ठिकाणी हवेचे दाब कमी होऊन वातावरणात उकाडा वाढण्यास सुरवात होते. त्यामुळे काही भागांत कमाल तापमानात चढ-उतार होतात, या वेळी आॅक्टोबरची चाहूल लागली असे ओळखले जाते.

जूनमध्ये माॅन्सूनचे आगमन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने माॅन्सून उत्तर भारताकडे जातो. त्यानंतर भारताच्या पश्चिमेकडील भागात मॉन्सून दाखल होतो. या पश्चिमेकडील भागात साधारणपणे पंधरा ते वीस दिवस जोरदार पाऊस पडतो. त्या वेळी सप्टेंबर महिना उजाडलेला असतो.

त्या वेळी हवामानात काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे वायव्य भारतात जोरदार पाऊस पडतो. पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी अधिक असते. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान असते, तर काही ठिकाणी ऊनही पडते. त्यामुळे वातावरणात दमटपणा वाढतो.

वायव्य भारतात पाऊस थांबतो
परतीच्या प्रवासाच्या काही दिवस आधी भारताच्या वायव्य भागात जोरदार पडतो. त्यानंतर पावसाचा जोर ओसरून पाऊस थांबतो. साधारणपणे पाच ते सहा दिवस पाऊस थांबल्यानंतर परतीचा सुरू होतो. या कालावधीत काही वेळा ऊन पडते. काही ठिकाणी ढगाळ हवामान असते. त्या वेळी वाऱ्याची दिशा बदलून ती वायव्य, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यास सुरवात होते. त्या वेळी राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या भागांतील पाऊस थांबलेला असतो.

असा होतो परतीचा प्रवास
हवामान विभागाकडून पाच दिवस आधी परतीच्या प्रवासाचा अंदाज दिला जातो. साधारणपणे राजस्थानच्या पश्चिम भागातून एक सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास होण्याचा अंदाज असतो. परंतु बदलत्या हवामानामुळे काही वेळा या भागात पाऊस सुरू असल्यास उशीरही होतो. एकंदरीत परतीच्या प्रवासाच्या वेळी मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, उत्तराखंड, गुजरात, झारखंड या भागांतही पावसाचे प्रमाण कमी होऊन परतीच्या पावसास अनुकूल स्थिती तयार होते.

त्या वेळी राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीचा पाऊस सुरू होऊन हा पाऊस जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू असा परतीचा प्रवास सुरू होतो. त्या कालावधीत देशातील काही ठिकाणी कमी-अधिक पाऊस होतो.

उत्तरेकडे हवेचे दाब वाढतात
परतीच्या पावसाच्या वेळी वायव्य भागात हवेचे दाब वाढून ते साधारणपणे १००८ हेप्टापास्कलपर्यंत गेलेले असतात. दक्षिणेकडील हवेचे दाब कमी म्हणजे १००६ हेप्टापास्कलएवढे असते. हळूहळू त्यात वाढ होते. त्या वेळी ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतात.

टप्प्याटप्प्याने हे वारे दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे अनेक भागांत जोरदार पाऊस होतो. या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी आठ ते बारा किलोमीटर एवढा असतो. त्या वेळी हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान सामान्य असते.

दक्षिण भारतात तापमान वाढते
परतीच्या पावसाच्या वेळी उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर ते दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत १००८ हेप्टापास्कल हवेचे दाब झालेले असतात. त्या वेळी महाराष्ट्राच्या मध्यावर व कोकणातही हवेचे दाब कायम असतात. त्या वेळी राजस्थान, उत्तरेकडील काश्मीरच्या भागात मॉन्सूनचा पाऊस थांबलेला असतो. परंतु हिंदी महासागराच्या पाच अक्षांश उत्तर विषुववृत्तीय भागात व ५० ते ८० रेखांशामध्ये तुरळक ठिकाणी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान किंचित वाढत असते. त्या वेळी सूर्य दक्षिणेकडे काहीसा झुकलेला असून, सूर्यकिरणे तिरपी पडण्यास सुरवात होते. परंतु काही वेळा ढगाळ हवामान, ऊन पडलेले असते. त्यामुळे देशातील तापमानातही बदल होऊन उत्तरेकडील तापमानात घट, दक्षिणेकडील तापमान वाढण्यास सुरवात होते.

कमी अधिक होतो पाऊस
ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने तिकडील वारे बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतात. टप्याटप्याने हे वारे जम्मू आणि काश्मिर, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांतून दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे अनेक भागांत जोरदार पाऊस होतो. काही ठिकाणी कमी पाऊस पडतो. दक्षिणेकडील तमिळनाडूच्या भागात परतीचा पाऊस थांबून ईशान्येकडील पाऊस नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत सुरू असतो.

महाराष्ट्राच्या पूर्व भागाला मिळतो दिलासा
परतीच्या पावसाच्या वेळी मध्य प्रदेशाकडून वारे वाहतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पूर्वेकडील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागांतही परतीचा चांगला पाऊस पडतो, परंतु कोकणात परतीचा पाऊस कमी होतो. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात झालेला हा पाऊस रब्बी पिकांना दिलासादायक ठरत असल्याने अनेक शेतकरी ज्वारी, हरभरा यांसारख्या पिकांच्या पेरण्या करतात.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...