agriculture news in marathi, return monsson will start from Saturday, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनची माघार शनिवारपासून
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) माघारीस अनुकूल स्थिती तयार होत अाहे. सध्या राजस्थानमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून जाताच माॅन्सून माघारी फिरण्याचे संकेत आहेत. यंदा २९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गतवर्षीही २७ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने देशातून काढता पाय घेतला होता.  

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) माघारीस अनुकूल स्थिती तयार होत अाहे. सध्या राजस्थानमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून जाताच माॅन्सून माघारी फिरण्याचे संकेत आहेत. यंदा २९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गतवर्षीही २७ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने देशातून काढता पाय घेतला होता.  

यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आगोदर मॉन्सून देवभूमी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात पोचण्यासाठी मॉन्सूनला तब्बल १० दिवस लागले. ८ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एकाच दिवशी हजेरी लावली. 

९ जून रोजी निम्मा महाराष्ट्र व्यापणाऱ्या माॅन्सूनची वाटचाल मेडन जुलिअन ऑस्सिलेशय या हवामान स्थितीच्या प्रतिकूल स्थितीमुळे थांबली. विषुववृत्ताकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह खं.िडत झाल्याने वाटचालीवर परिणाम झाला. २२ जुलै रोजी पुढील वाटचालीस सुरवात केली. त्यांनतर सुसाट सुटलेल्या मॉन्सूनने सर्वसाधारण वेळेतच्या (१५ जुलै) तब्बल १६ दिवस आधी म्हणजेच २९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. 

यंदा महिनाभर उशीर
यंदा वेळेआधीच दाखल झालेला माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासला मात्र उ.िशरा सुरुवात होत आहे. सर्वसाधारणपणे १ सप्टेंबर रोजी माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनचे अद्यापही देशभर अस्तित्व असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी (ता.१७) मॉन्सूनचे अस्तित्व अधोरेखित करणारा कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) विरून गेला. मात्र, बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळ वायव्येकडे सरकत गेल्याने राजस्थानमध्ये कमी दाबाचे क्षेत्र स.िक्रय आहे. माॅन्सूनच्या प्रवाहात असलेले बाष्प कमी होऊन आजपासून (ता. २५) पश्‍चिम राजस्थानात हवामान मुख्यत: कोरडे राहणार अाहे. तर, गुरुवारपासून (ता. २७) हवेच्या खालच्या थरात वाऱ्यांची दिशा बदलणार असल्याने २९ सप्टेंबर रोजी मॉन्सून राजस्थानमधून माघारी फिरण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले अाहे.

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...