agriculture news in marathi, return one lack fifty thousand rupees of loan waiver scheme, solapur, maharashtra | Agrowon

कर्जमाफीचे दीड लाख रुपये सोलापूर बॅंकेने पाठवले परत 
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

बॅंक ऑफ इंडियाच्या कोर्टी शाखेतून भगवान डोंबाळे व त्यांचे दोन भाऊ यांच्या नावाने कर्ज घेण्यात आले. ३१ जुलै २०१७ च्या थकबाकीनुसार त्यांच्याकडे दोन लाख ५४ हजार १४५ एवढी थकबाकी होती. कर्जमाफीच्या आदेशानुसार एकूण थकबाकीपेक्षा जास्त रक्कम कर्जमाफी म्हणून शेतकऱ्याला देता येणे शक्‍य नाही. काही तांत्रिक दुरुस्तीसाठी पैसे परत पाठवले आहेत. अजून कर्जमाफीचे काम चालू आहे. राहिलेली रक्कम दुरुस्त होऊन येताच त्यांना कर्जमाफी दिली जाईल. 
- ज्ञानदीप कुमार, व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर.

करमाळा, जि. सोलापूर   : कर्जमाफीचे खात्यावर जमा झालेले दीड लाख रुपये बॅंकेने परत पाठवले असल्याचा प्रकार करमाळा तालुक्‍यातील बॅंक ऑफ इंडियाच्या कोर्टी शाखेत घडला. वाशिंबे (ता. करमाळा) येथील माजी सरपंच व प्रसिद्ध पैलवान भगवान गणपत डोंबाळे यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. 

याबाबत भगवान डोंबाळे यांनी जिल्हा निबंधकांकडे लेखी तक्रार केली आहे. निबंधकांनी बॅंक ऑफ इंडियाच्या सोलापूर मुख्यालयाला याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दोन महिने होऊनही या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिले नाही. भगवान गणपत डोंबाळे व भाऊ बाळू गणपत डोंबाळे, बापू गणपत डोंबाळे यांनी मिळून ८ जुलै २०११ मध्ये सहा लाख ६८ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

त्यानंतर काही हप्ते भरले. ३० जून २०१६ ला एक लाख १९ हजार ४५ रुपये थकबाकी होती. ही थकबाकी ३१ जुलै २०१७ ला दोन लाख ५४ हजार १४५ एवढी झाली. असे एकूण तीन लाख ८२ हजार ९२३ रुपयांचे कर्ज तिघांच्या नावे होते. त्यानंतर दीड लाख कर्जमाफी आली.

वरील दोन लाख ३२ हजार ९२३ ही रक्कम भरून पूर्ण कर्ज भरले. त्यानंतर भगवान डोंबाळे यांच्या खात्यावर दीड लाख रुपये जमा झाले. मात्र, हे दीड लाख डोंबाळे यांना न देता बॅंकेने परत पाठवले आहेत, हे पैसे मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. 

दरम्यान, याबाबत भगवान डोंबाळे म्हणाले, की बॅंकेने माझ्या नावावर असलेले कर्ज भरण्यास सांगितले. आता आहे हे कर्ज भरा, नंतर कर्जमाफीचे दीड लाख रुपये आले की तुम्हाला देऊ असे सांगितले. त्याप्रमाणे मी कर्जाची रक्कम भरली. त्यानंतर माझ्या नावे कर्जमाफीचे पैसे आल्याचे बॅंकेचे पत्र आले. हे पैसे काढण्यासाठी बॅंकेत गेलो असताना मला पैसे काढू दिले नाहीत. नंतर काही दिवसांनी माझ्या खात्यावरील कर्जमाफीचे दीड लाख रुपये काढून परत पाठवल्याचे सांगितले. याबाबत मी विचारणा केली तर बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली.
 

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...