agriculture news in marathi, Return of rain in Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाचे पुनरागमन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नांदेड ः दीर्घ खंडानंतर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. ११) दुपारनंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे वाढीच्या, परिपक्वतेच्या अवस्थेतील सुकू लागलेल्या खरीप पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रविवारी (ता. १२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ३० तालुक्यातील १३३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद मंडळामध्ये (९६ मिमी) आणि किनवट मंडळामध्ये (६७ मिमी) या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

नांदेड ः दीर्घ खंडानंतर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. ११) दुपारनंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे वाढीच्या, परिपक्वतेच्या अवस्थेतील सुकू लागलेल्या खरीप पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रविवारी (ता. १२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ३० तालुक्यातील १३३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद मंडळामध्ये (९६ मिमी) आणि किनवट मंडळामध्ये (६७ मिमी) या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये दीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले. धर्माबाद, किनवट, माहूर, बिलोली, भोकर, मुदखेड, हिमायतनगर, मुखेड, अर्धापूर, नायगाव, कंधार तालुक्यात पावसाचा जोर होता. जिल्ह्यातील ७९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा, पालम तालुक्यात पावसाचा जोर होता. नऊ तालुक्यांतील ३६ मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. वसमत तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)ः नांदेड जिल्हा ः नांदेड शहर १९, नांदेड ग्रामीण २२, वजीराबाद २१, वसरणी १८, तरोडा २०, तुप्पा २०, लिंबगांव १८, विष्णुपुरी १८, अर्धापूर ३६, दाभड २९, मालेगांव १४, हदगांव २४, मनाठा १२, पिंपरखेड ११, निवघा १०, आष्टी ३०, देगलूर २३, खानापूर ९, शहापूर १५, मरखेल ७, मालेगांव ६, हणेगांव ७, हिमायतनगर २७, सरसम २९, जवलगांव २२, माहूर ३२, वाई बाजार ३८, वानोळा १५, सिंदखेड ४६, किनवट ६७, इस्लापूर १४, मांडवी ५२, बोधडी ४०, दहेली ४०, जलधारा ३४, शिवणी ४३, मुदखेड ३६, मुगट १९, बारड ३५, भोकर ४, मोघाळी २०, मातुळ ४१, किनी ३२, उमरी २८, शिंदी १७, गोलेगाव २०, धर्माबाद ९६, जारिकोट ४८, करखेली ५५, बिलोली ४५, लोहगाव ३०, कुंडलवाडी ३०, सगरोळी ३५, आदमापूर २८, नायगांव ३८, नरसी २२, मांजरम ११, बरबडा १८, कुंटूर २१, मुखेड २५, जांब २०, येवती २२, जहूर २२, चांडोला २५, मुक्रमाबाद ३८, बाऱ्हाळी २०, लोहा १०, माळकोळी १३, कलंबर २४, शेवडी ९, सोनखेड ९, कापशी २५.

परभणी जिल्हा ः झरी ६, दैठणा ५, पिंगळी ६, गंगाखेड १०, जिंतूर ९, बामणी १२, बोरी ५, पूर्णा ८, ताडकळस ५, लिमला ५, चुडावा १२, वालूर ६.

हिंगोली जिल्हा ः आखाडा बाळापूर ७, वारंगा फाटा ११, गोरेगाव ६, वसमत ९, हट्टा १२, गिरगाव १०, टेंभुर्णी २१, आंबा १५, हयातनगर १६, औंढा नागनाथ ६, जवळा बाजार १४, साळणा १७.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...