agriculture news in marathi, Revaluation of unaided agricultural colleges from January | Agrowon

विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांचे फेरमूल्यांकन जानेवारीपासून
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

पुणे : राज्यातील विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांच्या फेरमूल्यांकन कामकाजाला पुरी समितीकडून जानेवारीपासून सुरवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मूल्यांकनाचे अहवाल अनेक दिवस दडवून ठेवले जात असल्याचा आरोप खासगी महाविद्यालयांनी केला आहे.

पुणे : राज्यातील विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांच्या फेरमूल्यांकन कामकाजाला पुरी समितीकडून जानेवारीपासून सुरवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मूल्यांकनाचे अहवाल अनेक दिवस दडवून ठेवले जात असल्याचा आरोप खासगी महाविद्यालयांनी केला आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या अखत्यारित सध्या अ, ब, क आणि ड दर्जाची १५६ महाविद्यालये आहेत. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सर्वांत जास्त म्हणजे ६३ महाविद्यालयेत आहेत. आतापर्यंत 'ड' दर्जाच्या १९ महाविद्यालयांचे पुनर्मूल्यांकन झाले आहे; मात्र या पुनर्मूल्यांकनानुसार विद्यापीठांना कारवाई करण्यात अपयश आले आहे. मूल्यांकनाच्या निष्कर्षानुसार कारवाईला या महाविद्यालयांनी उच्च न्यायालयाकडून स्थगिती आणली आहे.

पुरी समितीकडून ‘क’दर्जाच्या महाविद्यालयांच्या पुनर्मूल्यांकनाचे काम लवकरच सुरू होईल. यात राहुरी येथील विद्यापीठातील १२, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ४, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या १५ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सहा महाविद्यालयांच्या समावेश असेल.

मूल्यमापन समितीच्या कामाकडे सध्या महाविद्यालयांचे लक्ष लागून आहे. समितीचे अध्यक्षपद डॉ. सुभाष पुरी यांना देण्यात आलेले आहे. समितीचे काम जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच समितीचा अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सूत्रांनी दिली.

पुरी समितीमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एन. एस. राठोरे, अकोला येथील कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. डी. एल. साळे, राहुरी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजितकुमार देशपांडे यांचा समावेश आहे. संबंधित विद्यापीठाच्या व्यतिरिक्त इतर कृषी अधिष्ठाता हा सदस्य सचिव, तर संबंधित विद्यापीठाचा अधिष्ठाता यात समन्वयक म्हणून काम करणार आहे.

मूल्यमापनाचे अहवाल तत्काळ मिळावेत
राज्यातील विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांना मूल्यमापनाचे अहवाल तत्काळ मिळावेत, अशी मागणी व्यवस्थापनवर्गाकडून होत आहे. मूल्यमापनाच्या मागे सुधारणेचा हेतू असावा; मात्र चुकीने कारवाई झाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशाराही महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने दिला आहे.

 महाविद्यालये सतत संभ्रमात
'विद्यापीठांकडून मूल्यमापन केल्यानंतर अहवालातील माहिती लवकर दिली जात नाही. मूल्यमापनात कोणती श्रेणी मिळाली याविषयी विद्यापीठे वेळेत माहिती देत नसल्यामुळे महाविद्यालये सतत संभ्रमात असतात. त्यानंतर थेट कारवाई केली जाते. त्यामुळे या मनमानी पद्धतीला नियंत्रित करण्यासाठी न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसतो, असेही महाविद्यालयांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
बॅंकांतील घोटाळ्याने पतशिस्त बिघडत नाही...शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर पतशिस्त बिघडते असा...
दूध करपतेय, लक्ष कोण देणार?गेल्या वर्षात तूर, सोयाबीन, कापूस या मुख्य शेती...
राज्यातील धरणसाठा ३३.८६ टक्क्यांवरपुणे  : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा...
अादेशाअभावी तूर खरेदी बंदचअकोला ः मुदत संपल्याने बुधवार (ता. १८) पासून बंद...
उद्योगांमध्ये वापर होणाऱ्या साखरेवर कर...कोल्हापूर  : देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी...
तापमानाचा पारा चाळीशीपारपुणे  : राज्यात उन्हाचा चटका वाढतच असून,...
नागरी सेवा मंडळ बनले दात नसलेला वाघपुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर अधिकाऱ्यांना...
ध्यास गुणवत्तापूर्ण केळी उत्पादनाचा...जळगाव जिल्ह्यातील केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर)...
जमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी?जी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...
पंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...
कृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...
कांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...
उन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...
तंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...
‘चंद्र’पूर तापलेलेच ! ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...
ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...
धुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे  ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...
बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...