महसूल विभाग लाचखोरीत सलग तिसऱ्या वर्षी नंबर वन

महसूल विभाग लाचखोरीत सलग तिसऱ्या वर्षी नंबर वन
महसूल विभाग लाचखोरीत सलग तिसऱ्या वर्षी नंबर वन

पिंपरी, जि. पुणे : लाचखोरांना पकडण्याच्या कारवाईत (ट्रॅप) राज्य लाचलुचपत विभागाचे (एसीबी) पुणे परिक्षेत्र (युनिट) २०१७ मध्येही राज्यात अव्वल राहिले आहे. अशा धवल आणि उच्च कामगिरीचे या युनिटचे हे ''हॅटट्रिक''चे वर्ष ठरले. दरम्यान, राज्यातील एकूण ट्रॅप (सापळे) २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये ११ टक्क्‍यांनी कमी झाले. मात्र, लोकप्रतिनिधींविरुद्धच्या कारवाईत या वर्षी वाढ नोंदविली गेली आहे.  तसेच शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील एसीबीच्या कारवाईत २०१७ मध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे लाच घेतलेल्या १५३ भ्रष्ट लोकसेवकांना सरकारने अद्याप निलंबित केलेले नाही. तर, अशा २६७ लाचखोरांविरुद्ध खटले दाखल करण्यासाठीही त्यांनी परवानगी दिलेली नाही. यातून सरकार भ्रष्ट सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. मावळत्या वर्षात महसूल विभागाचे सर्वाधिक ट्रॅप झाल्याचे २०१७ हे हॅटट्रिकचे वर्ष ठरले. तर पोलिस खाते या कामगिरीत दुसऱ्या स्थानी आहे. "जनतेत आलेली जागृती, त्यासाठी सुरू केलेले उपक्रम आणि टीम स्पिरिट यामुळे पुणे युनिटची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे," असे मत पोलिस अधीक्षक व पुणे युनिटचे प्रमुख संदीप दिवाण यांनी व्यक्त केले.  २०१४ मध्ये राज्य एसीबीच्या इतिहासात ट्रॅपची सर्वोच्च कामगिरी (१२४५) कामगिरी झाली होती. त्यानंतर त्याला ओहोटी लागली. या घटत्या कामगिरीची हॅटट्रिक २०१७ ला झाली. या वर्षी ८७० ट्रॅप झाले. २०१६ ला ते ९८५ होते. राज्यातील एसीबीच्या आठ युनिटपैकी सर्वोच्च कामगिरी (१८७) पुणे युनिटने केली आहे. औरंगाबाद दुसऱ्या स्थानी (१२७) राहिले. तर, तिसऱ्या क्रमांकावरील मुंबईत वर्षभरात फक्त ट्रॅप झाले आहेत. महसूल पोलिसानंतर पंचायत समिती विभागाचे अधिकारी व कर्मचारी लाच घेताना पकडले गेले आहेत. त्यानंतर महापालिका, शिक्षण विभाग, राज्य वीज कंपनी (एमएसईबी), जिल्हा परिषद, वन विभाग, जलसंपदा आणि दहाव्या स्थानी आरोग्य विभाग आहे. बंदर विभाग, म्हाडा, क्रीडा, अन्न आणि औषध प्रशासन ही चार खाती तळाला आहेत. या चारही विभागांत वर्षभरात फक्त एकेक ट्रॅप झालेला आहे. लाच घेऊनही १५३ सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे २०१७ अखेरपर्यंत निलंबन झालेले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com