अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा संप कायम

अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा संप कायम
अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद अांदोलन तिसऱ्या दिवशीही शुक्रवारी (ता. १३) सुरूच असल्याने कामकाज ठप्प होते. संघटनेने मागण्यांसाठी मंगळवारपासून (ता. १०) काम बंद आंदोलन सुरू केले अाहे. या आंदोलनात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, वाहनचालक असे सुमारे अडीच हजारांवर कर्मचारी सहभागी झाले अाहेत. तसेच पदोन्नत नायब तहसीलदारांनीही आंदोलनात सहभाग घेतला अाहे. या संपामुळे प्रत्येक तहसील कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प झालेले अाहे.
 
कर्मचाऱ्यांनी हे अांदोलन पुरवठा विभागातील पदभरती स्थगित करावी या मागणीसाठी प्रामुख्याने सुरू केले अाहे. सोबतच कनिष्ठ लिपिक पदनाम बदलून महसूल सहायक करावे, कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करावे, जुनी पेंशन योजना लागू करावी, पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेने न भरता पदोन्नतीद्वारे भरावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, कार्यालयीन कामकाजाचा अाठवडा ५ दिवसांचा करावा, अव्वल कारकून संवर्गाची वेतन त्रुटी दूर करावी, आकृतीबंधाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती तात्काळ देण्यात यावी या मागण्यांसाठी काम बंद अांदोलन सुरू अाहे.
 
यामध्ये अकोला जिल्ह्यातील ४२३, बुलडाणा ७१२ अाणि वाशीम जिल्ह्यातील ३४४ पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले अाहेत. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाचे महसूलविषयक कामकाज ठप्प झाले आहे. कामासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातांनी परतावे लागत अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com