महसूल अधिकाऱ्यांसाठी खासगी सुरक्षारक्षक : चंद्रकांत पाटील

महसूल अधिकाऱ्यांसाठी खासगी सुरक्षारक्षक : चंद्रकांत पाटील
महसूल अधिकाऱ्यांसाठी खासगी सुरक्षारक्षक : चंद्रकांत पाटील

धुळे - वाळूउपसाचे राज्य शासन लवकरच कडक धोरण जाहीर करणार आहे. महसूल अधिकाऱ्यांना वाळूमाफियांपासून संरक्षणासाठी खासगी सुरक्षारक्षक घेण्यास मंजुरी देऊ, असे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. पाटील यांच्या उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसमवेत आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पगारे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की वाळूबाबतच्या नव्या धोरणात कुठे वाळू उत्खनन करावे, कुठे करू नये याबाबतच्या नियमांचा समावेश असेल. वाळूच्या महसुलातून संबंधित ग्रामपंचायतींना 25 टक्के महसूल देण्याचे नियोजन आहे. महसूल अधिकाऱ्यांना खासगी सुरक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात येईल.

आगामी तीन वर्षांत राज्यांत वेगवेगळ्या माध्यमांतून सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे रस्ते होतील, असेही त्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com