agriculture news in marathi, Revenue organization 'SBI' shocks | Agrowon

पीककर्ज : महसूल संघटनेचा ‘एसबीआय’ला झटका
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

यवतमाळ : स्टेट बॅंक आँफ इंडियामधून महसूल कर्मचारी संघटनेच्या ११३ सभासदांनी वैयक्तिक खाते बंद करून बॅंकेला मोठा झटका दिला. विशेष म्हणजे, सोमवारी (ता. २५) पुन्हा अनेक सभासद ‘एसबीआय’मधील खाते बंद करणार असून त्यानंतर जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची विश्‍वसनीय सूत्रांची माहिती आहे.

यवतमाळ : स्टेट बॅंक आँफ इंडियामधून महसूल कर्मचारी संघटनेच्या ११३ सभासदांनी वैयक्तिक खाते बंद करून बॅंकेला मोठा झटका दिला. विशेष म्हणजे, सोमवारी (ता. २५) पुन्हा अनेक सभासद ‘एसबीआय’मधील खाते बंद करणार असून त्यानंतर जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची विश्‍वसनीय सूत्रांची माहिती आहे.

शेतकऱ्यांना कर्जवाटपाची सर्वांत मोठी जबाबदारी भारतीय स्टेट बॅंकेवर आहे. तसे आदेश शासन व जिल्हा प्रशासनाकडून बॅंकेला सातत्याने दिले गेले होते. मात्र, त्यानंतरही बॅंक व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात फारसी सुधारणा झाली नाही. परिणामी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘एसबीआय’मधील सहा अत्यंत महत्त्वाचे खाते बंद करण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. महसूल कर्मचारी संघटनेनेसुद्धा पत्र काढत या कारवाईला पाठिंबा दिला. शिवाय, सभासदांना वैयक्तिक खाते बंद करण्याचे आवाहन केले. महसूल कर्मचारी संघटनेच्या या आवाहनाला सभासदांनी पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापनेवर असलेल्या तब्बल ११३ कर्मचाऱ्यांनी आपली वैयक्तिक खाते ‘एसबीआय’मधून बंद केली. याच दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी युनायटेड बॅंकेत खाती उघडली. विशेष म्हणजे, सोमवारी (ता. २५) उर्वरित कर्मचारीही आपली खाती बंद करणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरावरील संघटनेचे सभासद खाते बंद करणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनेच्या या निर्णयामुळे ‘एसबीआय’च्या ठेवीवर मोठ्या प्रमाणात फरक पडणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

‘आम्ही सर्व शेतकरीपुत्र आहोत. शेतकऱ्यांना पीककर्ज देणे आवश्‍यक असतानाही बॅंकेचे अडेलतट्टू धोरण आहे. त्यामुळे आम्ही हे खाते बंद करण्याचा निर्णय घेतला असून कुठे खाते काढायचे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे.’
- नंदकुमार बुटे, सरचिटणीस, महसूल कर्मचारी संघटना

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...