मत्स्य व्यवसायातून मिळाला सव्वा कोटीचा महसूल

मत्स्य व्यवसायातून मिळाला सव्वा कोटीचा महसूल
मत्स्य व्यवसायातून मिळाला सव्वा कोटीचा महसूल

नाशिक : नाशिक विभागातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताब्यातील पेसा क्षेत्रातील तलावांव्यतिरिक्त ३०७ पैकी २५३ पाटबंधारे तलावांमधून २०१७-१८ या वर्षात १३ हजार ९७५ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले आहे. यातून सरकारला २ कोटी ३० लाख ९० हजार ४६१ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

नाशिक विभागात २ हजार ४४८ तलाव आहेत. त्यापैकी २०० हेक्टर जलक्षेत्रावरील तलावांची संख्या ३९ तर २०० हेक्टर, जलक्षेत्राखालील तलावांची संख्या २६८ इतकी आहे. या सर्व तलावांचे जलक्षेत्र ५१ हजार ५६२ हेक्टर इतके आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या मालकीचे विभागात १ हजार ८४३ तलाव आहेत. यातील १३२ तलाव पेसा क्षेत्रात येतात. पेसा क्षेत्रातील सर्व तलाव स्थानिक ग्रामपंचायतींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थानिक ग्रामपंचायतींच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. २०० हेक्टरवरील आणि २०० हेक्टरखालील जलक्षेत्र असलेल्या ३०७ पैकी ५४ पाटबंधारे तलाव पुरेशा पाण्याअभावी मत्स्य व्यवसायासाठी ठेक्याने दिलेले नव्हते. उर्वरित २५३ तलावांमधून जुलै २०१७ ते जून २०१८ या आर्थिक वर्षात मत्स्य व्यवसायातून २ कोटी ३० लाख ९० हजार ४६१ रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षात नाशिक विभागात १३ हजार ९७५ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले. विभागात जळगाव जिल्हा मत्स्य उत्पादनात आघाडीवर असून त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात मत्स्य उत्पादन झाले आहे.

५४ तलाव कोरडे गेल्या वर्षी कमी पाऊस झालेल्या विभागातील ५४ तलाव लवकर कोरडे झाले. परिणामी तेथून मत्स्य उत्पादन मिळाले नाही. विभागातील नाशिक जिल्ह्यातील २०, जळगावमधील १०, नगरमधील १९, नंदुरबारमधील ४ आणि धुळ्यातील एक अशा तलावांचा मत्स्य व्यवसायाचा ठेका गेल्या वर्षी देता आला नव्हता.

नाशिक विभागात मत्स्य उत्पादनासाठी मोठा वाव आहे. शेतकऱ्यांनीही मत्स्य व्यवसायाकडे शेतीपूरक उद्योग म्हणून बघितले पाहिजे. सरकारच्या नीलक्रांती योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठीही विविध योजना उपलब्ध आहेत. - सुजाता साळुंखे, प्रादेशिक उपायुक्त, मत्स्य व्यवसाय, नाशिक

नाशिक विभागातील नीलक्रांती
जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र एकूण उत्पादन (मे.ट.) एकूण महसूल (रु.)
जळगाव ४,४५९ ४,६६० ९०,१७,७९८
नाशिक १७०० ४,११० ५६,८४,५६१
नगर १,१४४ १,७९१ ५६,३३,१४७
धुळे ८१० २,०७९ २५,६०,८४५
नंदुरबार १८५ १,३३५ १,९४,११०
एकूण ८,२९८ १३,९७५ २,३०,९०,४६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com