agriculture news in Marathi, Revival of the Agricultural Goods Export Facility Center in Jalna | Agrowon

जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा केंद्राचे पुनरुज्जीवन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील निर्यात सुविधा केंद्राचे पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी (ता. २३) या निर्यात सुविधा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. आंब्यासोबतच द्राक्ष, डाळिंब, केळी, पिकांसाठीही रायपनींग चेंबर, प्रीकूलिंग, शीतगृह व निर्यातीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. 

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील निर्यात सुविधा केंद्राचे पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी (ता. २३) या निर्यात सुविधा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. आंब्यासोबतच द्राक्ष, डाळिंब, केळी, पिकांसाठीही रायपनींग चेंबर, प्रीकूलिंग, शीतगृह व निर्यातीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. 

जवळपास चौदा वर्षांपूर्वी राज्याच्या कृषी पणन मंडळाने अपेडामार्फत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा निर्यात केंद्राची उभारणी केली होती. १२ जून २००४ ला उद्‌घाटन झालेल्या या निर्यात सुविधा केंद्राचे काम जवळपास २०१४ पर्यंत चालले. त्यानंतर मात्र या केंद्रावरून आंब्याची निर्यात झाली नाही. त्यामुळे निर्यात केंद्र बंद पडले होते. बंद पडलेल्या या निर्यात केंद्राला चालविण्याची तयारी बाजार समितीने प्रदर्शित केली. त्यानंतर त्याविषयीचे सोपस्कार शासनाच्या नियमानुसार पार पडले.

जालना बाजार समितीने १ नोव्हेंबर २०१७ जालना बाजार समितीकडे या निर्यात केंद्राची सूत्रे आली. त्यामुळे बाजार समितीने शेतकऱ्यांची गरज व केंद्र सुरू राहण्यासाठी आवश्‍यक बाबीची चाचपणी केली. त्यानुसार जवळपास दीड वर्षांपासून निर्यात केंद्रात आवश्‍यक ते बदल करून घेतले. त्यामध्ये आंब्यासोबतच द्राक्ष, डाळिंब व केळी या पिकांसाठीही रायपनिंग चेंबर, प्रीकूलिंग, शीतगृह आदी सुविधा उपलब्ध करून घेतले. त्यामुळे आता या केंद्रावरून कृषी माल निर्यातीची संधी प्राप्त होणार आहे.

या वेळी शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी उद्धवराव खेडेकर, रवींद्र गोर्डे, पुंजारा भूतेकर, जयकिसन शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली.

शनिवारी उद्‌घाटन 
राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते या कृषी माल सुविधा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी जिल्हा परिषदेच अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपजिल्हाप्रमुख पंडितराव भूतेकर, कृषिभूषण उद्धवराव खेडेकर, सभापती पांडुरंग डोंगरे आदींची उपस्थिती राहणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...