agriculture news in marathi, rice crop damage due to rain in palghar district | Agrowon

पालघर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

वाडा, जि. पालघर  : तालुक्‍यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने हळव्या भाताच्या पिकाला तडाखा बसला आहे. कापणीसाठी तयार झालेल्या आणि काही जणांनी कापणी करून सुकवण्यासाठी शेतात ठेवलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी हळव्या भाताचे पीक घेतात. हे पीक आठ दिवसांपूर्वीच कापणीयोग्य झाले. काही शेतकऱ्यांनी कापणी सुरूही केली; परंतु पावसाने दोन दिवस कहर केल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले पीक वाहून गेले, तर अनेक ठिकाणी तयार पीक शेतातच आडवे झाले. हाती आलेले पीक पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

वाडा, जि. पालघर  : तालुक्‍यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने हळव्या भाताच्या पिकाला तडाखा बसला आहे. कापणीसाठी तयार झालेल्या आणि काही जणांनी कापणी करून सुकवण्यासाठी शेतात ठेवलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी हळव्या भाताचे पीक घेतात. हे पीक आठ दिवसांपूर्वीच कापणीयोग्य झाले. काही शेतकऱ्यांनी कापणी सुरूही केली; परंतु पावसाने दोन दिवस कहर केल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले पीक वाहून गेले, तर अनेक ठिकाणी तयार पीक शेतातच आडवे झाले. हाती आलेले पीक पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेताचे बांध वाहून गेले आहेत. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष पांडुरंग पटारे यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

विक्रमगड, जि. पालघर : पावसाचा जोर कायम राहिल्यास तयार झालेले भाताचे पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.  विक्रमगड परिसरात संततधार सुरू असल्याने भात आणि अन्य पिके अडचणीत आली आहेत.

हळव्या भाताचे पीक कापणीला आले असून गरवे पीकही तयार होण्याचा स्थितीत आहे. शेतकरी दसऱ्याच्या मुहूर्तावर कापणी सुरू करतात. पाऊस थांबत नसल्याने शेतात पाणी साचून पीक कुजण्याचा धोका निर्माण झाल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. खुडेद, बोरसेपाडा, ओंदे, शिल, झडपोली भागांत शेताचे बांध पावसामुळे वाहून गेले. पावसाच्या लहरीपणामुळे भातशेती करणे जिकिरीचे होत चालले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भातशेतीचे क्षेत्र कमी होण्याची शक्‍यता आहे, असे मत शेतकरी कैलास तुंबडा यांनी व्यक्त केले.

डहाणू  : डहाणू तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेती, मिरची आणि केळी बागायती उद्‌ध्वस्त झाली आहे. सरकारने नुकसानीची तातडीने पाहणी करून
मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. डहाणू परिसरात मंगळवारी (ता. १९) रात्री मुसळधार पाऊस, वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले.

बावडा येथील बबन चुरी यांची केळीची बाग, फुलांची लागवड, शेड आणि सुरेंद्र पाटील यांची भातशेती व केळीची बाग उद्‌ध्वस्त झाली. वाणगाव परिसरात मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांनी उभारलेली शेडनेट फाटून गेल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. भातपीक भुईसपाट झाले.

इतर ताज्या घडामोडी
युरोपीय महासंघाने तयार केला...युरोपीय महासंघाच्या संयुक्त संशोधन केंद्राच्या...
उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात शनिवारी (...
शाश्वत विकासासाठी ग्राम सामाजिक...औरंगाबाद ः ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधांच्या...
पीककर्जासाठी टाळाटाळ केल्यास कारवाई :...कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपात...
`विश्वास`चे सात लाख टनांपेक्षा जास्त...शिराळा, जि. सांगली : विश्वास साखर कारखाना २०१८-...
शेतकऱ्यांना समान पीकविमा परतावा मिळावा...नांदेड ः गतवर्षीच्या खरिपातील पिकांच्या नुकसानी...
खरिपाचा पेरा ११६ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात आतापर्यंत खरिपाची पेरणी ११६...
वऱ्हाडात विविध ठिकाणी जोरदार पावसाची...अकोला ः अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत शनिवारी (ता....
शेतकरी आणि ग्राहकांची सुयोग्य सांगड...पुणे ः अनियमित माॅन्सून, बाजारभावाची अनिश्चितता,...
शेतकरी अात्महत्यांनी बुलडाणा हादरलाबुलडाणा  ः खरीप हंगाम सुरू झाला असून,...
खानदेशात सुमारे ४ लाख हेक्‍टरवर पेरण्याजळगाव : खानदेशातील सुमारे १६ लाख हेक्‍टर...
खरिपात भौगोलिक स्थितीचा विचार करा :...अकोला ः आधुनिक शेती तंत्रज्ञानुसार उत्पादन...
सातारा जिल्ह्यात ३५ टॅंकरद्वारे...सातारा ः जिल्ह्यात माॅन्सूनचे दमदार आगमन होऊनही...
सव्वीस जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
‘विलास शिंदे’ यांना ‘नाशिकभूषण’...नाशिक  : स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते...
वनहक्क दावे तीन महिन्यांत निकाली...नाशिक  : आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून...
तलाव, बंधाऱ्यांच्या कामांची होणार...पुणे : पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणारी,...
जळगाव जिह्याच्या पश्‍चिम भागात...जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) दुपारी...
पिकाच्या मूलस्थानी जलसंधारण महत्त्वाचे...समतल मशागत आणि पेरणीमुळे पिकाच्या दोन ओळींतील...
‘स्वाभिमानी’चे सेंट्रल बँकेसमोर अांदोलनबुलडाणा ः दाताळा (ता. मलकापूर) येथील सेंट्रल...