गवारगमसह तांदूळ निर्यात वाढली

गवारगमसह तांदूळ निर्यात वाढली
गवारगमसह तांदूळ निर्यात वाढली

मुंबई ः अमेरिकेतून मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशातून एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये गवारगमच्या निर्यातीमध्ये ६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे अपेडाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. तसेच बासमतीची काही प्रमाणात तर गैर बासमती तांदळाच्या निर्यातीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत जुलैमध्ये तेलाच्या उत्पादनात १२ टक्क्यांनी वाढ झाली. गवारगमचा उपयोग क्रूड तेल उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे गवारगमला येथे मागणी असते. भारतात जागतिक उत्पादनाच्या ८० टक्के उत्पादन होते. परिणामी अमेरिका, जर्मनी आणि चीनमधून भारतीय गवारगमला चांगली मागणी असते.

इराणमधून मागणी असल्याने बासमती तांदळाची निर्यात ०.४ टक्क्यांनी तर बांगलादेशसह पश्चिम आशियातील देशांतून मागणी वाढल्याने गैर बासमती तांदळाची निर्यात ३ टक्क्यांनी वाढली आहे. गहू, भुईमूग तसेच इतर तृण आणि कडधान्यांमध्ये मात्र घट झाल्याचे अपेडाच्या आकडेवारीवरून दिसत आहे.  

शेतमाल निर्यातस्थिती (एप्रिल ते जुलै, निर्यात ः टनांमध्ये)
शेतमाल २०१६-१७ २०१७-१८
बासमती तांदूळ १५४९७१६ १५५६३२२
गैर बासमती तांदूळ २३५३१९३ २४३३३७१
गहू १७१६३३ ९९४७७
कडधान्य ६२६७३ ५७९७७
भुईमूग १९३२९१ १२५२१०
गवारगम १०५२१४ १७८११९
इतर तृणधान्य ३१२१६७ २०००९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com