agriculture news in Marathi, rice production will touch 164 million ton in India, Maharashtra | Agrowon

भारतात १६४ दशलक्ष टन भात उत्पादन होणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली ः भारतात २०१७-१८ च्या हंगमात १६४.२ दशलक्ष टन भाताचे उत्पादन होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) व्यक्त केला. याआधी ‘एफएओ’ने भारतात १६५.५ दशलक्ष टन भाताचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यात १.३ दशलक्ष टनांची घट करून सुधारित अंदाज जाहीर केला आहे. 

नवी दिल्ली ः भारतात २०१७-१८ च्या हंगमात १६४.२ दशलक्ष टन भाताचे उत्पादन होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) व्यक्त केला. याआधी ‘एफएओ’ने भारतात १६५.५ दशलक्ष टन भाताचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यात १.३ दशलक्ष टनांची घट करून सुधारित अंदाज जाहीर केला आहे. 

भारतात मॉन्सूनचा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उत्पादनात घट होणार असल्याचे ‘एफएओ’ने म्हटले आहे. यंदा हवामान विभागाने देशात ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरी ९५ टक्केच पाऊस झाला त्याचा परिणाम शेतीवर होणार असल्याने भात उत्पादन घटेल. हवामान विभागाने ९८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर यंदा देशात १६५.५ दशलक्ष टन भाताचे उत्पादन होईल, असा अंदाज ‘एफएओ’ने व्यक्त केला होता. 

सुधारित अंदाजात ‘एफएओ’ने जागतिक भात उत्पादनातही ४.१ दशलक्ष टन घट होणार असल्याचे सांगितले आहे. आधी ‘एफएओ’ने जागतिक भात उत्पादन ७५८.७ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आता त्यात घट होऊन ७५४.६ दशलक्ष टन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा प्रथमच सुधारित अंदाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घट होणार असल्याचे ‘एफएओ’ने जाहीर केले आहे. याआधी २०१६ मध्ये सुधारित अंदाजात ६० हजार टनांची घट होणार असल्याचे सांगितले होते. 

उत्पादनात घट
‘एफएओ’ने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार जागतिक उत्पादनात ४.१ दशलक्ष टन घट होऊन ७५४.६ दशलक्ष टन उत्पादन होईल. बांगलादेशच्या उत्पादनात पूर आणि कीड-रोगांमुळे १ दशलक्ष टन घट होऊऩ ५१.२ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. व्हिएतनामध्ये यंदा मागील वर्षीपेक्षा उत्पादनात २.७० लाख टन घट होऊन ४३.३ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. मात्र पाकिस्तानमध्ये पूरक वातावरण असल्याने भात उत्पादनात ५ टक्के वाढ होऊन १०.८ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे ‘एफएओ’ने म्हटले आहे.

इतर अॅग्रोमनी
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...