agriculture news in Marathi, ridge guard at 300 to 500 rupees in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात दोडका ३०० ते ५०० रुपये दहा किलो
राजकुमार चौगुले
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात दोडका, वरण्याच्या दरात तेजी होती. दोडक्‍यास दहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर वरण्यास दहा किलोस २५० ते ३०० रुपये दर होता. टोमॅटोची दररोज एक ते दीड हजार क्रेट आवक होती. टोमॅटोस दहा किलोस ८० ते १३० रुपये दर होता. 

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात दोडका, वरण्याच्या दरात तेजी होती. दोडक्‍यास दहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर वरण्यास दहा किलोस २५० ते ३०० रुपये दर होता. टोमॅटोची दररोज एक ते दीड हजार क्रेट आवक होती. टोमॅटोस दहा किलोस ८० ते १३० रुपये दर होता. 

वांग्याची तीनशे ते चारशे करंड्या आवक होती. वांग्यास दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत बहुतांशी भाजीपाल्याचे दर स्थिर होते. ओल्या मिरचीची दररोज दोनशे ते दोनशे पन्नास पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते २४० रुपये दर होता. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचे वातावरण असल्याने याचा परिणाम गवारीवर होत आहे. 

थंडीमुळे गवारीची वाढ फारशी होत नसल्याने गवारीच्या आवकेत घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गवारीची दररोज केवळ आठ ते दहा पोती आवक होत आहे. गवारीस दहा किलोस ४५० ते ५०० रुपये दर आहे. गाजराच्या आवकेत गेल्या सप्ताहापासून सातत्य टिकून आहे. सांगली, बेळगाव जिल्ह्यांतून गाजराची दररोज दीडशे ते दोनशे पोती आवक होत आहे. गाजरास दहा किलोस ५० ते २५० रुपये दर मिळत आहे. सातारा भागातून एकशे पंचवीस ते एकशे पन्नास पोती आल्याची आवक झाली. आल्यास दहा किलोस २०० ते २२० रुपये दर होता. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची चौदा ते पंधरा हजार पेंढ्यांची आवक होती. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ३०० रुपये दर होता. कोथिंबिरीच्या दरातही फारशी वाढ दिसून आली नाही. मेथीच्या आवकेत मात्र चांगलीच वाढ होती. मेथीची दररोज वीस ते पंचवीस हजार पेंढ्या आवक झाल्याने दर स्थिर राहू शकले नाहीत. मेथीस शेकडा १५० ते ३०० रुपये दर मिळला.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...