परभणीत दोडका प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये

दोडका
दोडका

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १५) दोडक्याची २० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल २००० ते ३०००  रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २०० ते ६०० रुपये दर मिळाले. मेथीच्या ४५ हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा १०० ते ३०० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये मिळाले. चुक्याची ८ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची १३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ५५ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक असताना १००० ते १५०० रुयये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोबीची ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतमाल     आवक     किमान     कमाल
फ्लाॅवर     १०     १५००     २५००
काकडी     २५     ४००     ८००
दुधी भोपळा  १५     ५००     ८००
कांदापात     १५     १०००     १५००
गाजर     ८०     ४००     १०००
लिंबू     १५ ८००     १५००
बीट     ७     ८००     १५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com