शेतकऱ्यांना दर ठरवण्याचा अधिकार हवा ः डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य

शेतकऱ्यांना दर ठरवण्याचा अधिकार हवा ः डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य
शेतकऱ्यांना दर ठरवण्याचा अधिकार हवा ः डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य

सोलापूर : शेती क्षेत्राकडे बघण्याचा तरुणांचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. पण शेतीसंबंधित धोरणात बदल झाला पाहिजे. विशेषतः शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार मिळावा, असे प्रतिपादन होटगी मठाचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

कारहुणवीनिमित्त बुधवारी (ता. २७) येथील कसबा गणपती शेतकरी मंडळातर्फे आयोजित बैलजोड्यांची मिरवणूक आणि कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, केदार मेंगाणे आदी उपस्थित होते. दरम्यान, विविध रंगांनी सजवलेल्या सजवलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली.

शिंदे म्हणाले, "शेती हे आपल्या देशाचे वैभव आहे. त्याची जपणूक करणे ही आपल्या संस्कृतीची मोठी परंपरा आहे. त्यात बैलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कसबा गणपती शेतकरी मंडळाकडून बैलजोडीचे पूजन व शेतकरी, सालगड्यांचा सन्मान हा एक आगळावेगळा उपक्रम आहे. बदलत्या काळातही मंडळाने पारंपरिकता जपली आहे.''

कृषिनिष्ठ पुरस्काराचे मानकरी ऍथ्युरीयम फुलाचा प्रकल्पासाठी आनंद मेंगाणे व सिद्धेश्वर जोकारे, हरभऱ्याच्या विक्रमी उत्पादनासाठी लोकेश विभूते (दर्शनाळ, अक्कलकोट) यांना कृषिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  मेंगाणे यांचे सालगडी नामदेव दुधभाते आणि विभूते यांचे सालगडी कोंडाजी चौधरी यांना सिद्रामप्पा गुंगे यांच्या स्मरणार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले. बृहन्मठ होटगी संस्थेतर्फे तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य यांच्या स्मरणार्थ कृषिनिष्ठ जीवनगौरव गौरव पुरस्कार राजशेखर गुंगे (देगाव), शशिकांत चौगुले (दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर), शरणप्पा पाटील (दर्गनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) यांना देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com