agriculture news in marathi, The rights of the district collectors to take action against contractors | Agrowon

ठेकेदारांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार : राम शिंदे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

अकाेला  ः जलयुक्त शिवारअंतर्गत विविध कामांत नियमितता करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध अाता कारवाई करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अाले अाहेत. याबाबत शासनाने धोरण ठरविले असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी बुधवारी (ता. ८) सायंकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, मृद् व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय अायुक्त पीयूष सिंह व पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित हाेते.

अकाेला  ः जलयुक्त शिवारअंतर्गत विविध कामांत नियमितता करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध अाता कारवाई करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अाले अाहेत. याबाबत शासनाने धोरण ठरविले असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी बुधवारी (ता. ८) सायंकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, मृद् व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय अायुक्त पीयूष सिंह व पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित हाेते.

या निर्णयामुळे जलयुक्तच्या कामातील दिरंगाई करणाऱ्यांवर वचक निर्माण होईल. जिल्हाधिकारी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे, त्याच्याविरुद्ध फाैजदारी दाखल करण्याचे अधिकार दिल्याचे सांगत शिंदे पुढे म्हणाले, ‘जलयुक्त’च्या कामात अनियमितता हाेऊ नये यासाठी तालुका, उपविभाग, जिल्हा, विभागीय स्तरावर समित्या स्थापन केल्या अाहेत.

मुख्य सचिवांच्या स्तरावरसुद्धा समिती स्थापन करण्यात आली. समित्यांना ‘जलयुक्त’च्या काेणत्याही कामात दाेष, त्रृटी, अनियमितता आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करता येईल. यासंदर्भात उच्च न्यायालयातदेखील जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने माजी न्यायाधीश जॉनी जाेसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती काही प्रकरणांचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे.

जलयुक्तच्या कामात पुढाकार घेणाऱ्या गावांना, तालुक्यांना, जिल्ह्यांना तसेच पत्रकारांना रोख रकमेचे पुरस्कार दिले जात अाहेत. अकोला येथे झालेल्या सोहळ्यात एक काेटी १० लाख ३४ हजार रुपयांचे ६९ पुरस्कार वाटप केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

बाजारभाव-हमीभाव यातील तफावत देण्याचा विचार
शेतीमालाचे भाव पडल्याचा मुद्दा कृषिमंत्री फुंडकर यांना विचारला असता त्यांनी शेतीमालाचे बाजारातील भाव व हमीभाव यातील तफावत शेतकऱ्याला देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. जर खुल्या बाजारात शेतीमाल हमीभावापेक्षाही कमी दराने विकल्या जात असेल तर तो शासन खरेदी करेल. यासाठी हमीभाव खरेदी केंद्र उघडण्यात अाली अाहेत. कीडनाशकाच्या विषबाधेतून अकाेला जिल्ह्यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, असे असताना सुद्धा एकाही कीटकनाशक विक्रेत्यावर फाैजदारी दाखल करण्यात आली नाही, असे विचारले असता कीटनाशक बळीप्रकरणी एसआयटीच्या अहवालावर कारवाई करण्यात येईल. तर हरभरा बियाणे घोळप्रकरणी काय कारवाई केली याचा अहवाल दोन दिवसांत घेत असल्याचे सांगतिले. या वेळी नोटाबंदीचे समर्थन करीत राम शिंदे, पांडुरंग फुंडकर या दोघांनीही विरोधकांवर टीका केली. मुद्दाच नसल्याने ते अशी अांदोलने करीत असल्याचे ते म्हणाले.  

इतर बातम्या
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
पुणे जिल्ह्यात रब्बीत अवघे २५ टक्के...पुणे : शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुणे जिल्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
सरपंचांनी कारकीर्दचे स्मरण होईल असे काम...कोल्हापूर : सरपंचांनी नैतिकता जपत निरपेक्ष व...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
बियाणे कंपन्यांत पाकिटावरील...नागपूर : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या...
टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारयवतमाळ : पॉवरग्रीड कंपनीच्या वतीने महागाव, पुसद...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आज उद्‌घाटनमुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा...
मोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे...अमेरिकेतील दक्षिण डाकोटा राज्य विद्यापीठातील...
जमिनीतील जिवाणूंच्या गुणसूत्रीय रचनांचा...जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण...