agriculture news in marathi, Rise in temperature | Agrowon

राज्याच्या तापमानात वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या तापमानात चढ उतार होत आहे. राज्यात विदर्भ, कोकणात कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांची वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली, तर मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांशी भागात मुख्यत: कोरडे हवामान होते. शनिवारपर्यंत (ता.४) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या तापमानात चढ उतार होत आहे. राज्यात विदर्भ, कोकणात कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांची वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली, तर मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांशी भागात मुख्यत: कोरडे हवामान होते. शनिवारपर्यंत (ता.४) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

राज्यात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या पुढे गेला आहे, तर रात्रीचे तापमानही २२ ते २७ अंशाच्या जवळपास आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात तापमानात वाढ होण्याबरोबरच ढगाळ हवामान असल्याने उकाडाही वाढला आहे. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास आहे. विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे ३३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.   

मध्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतातील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात किनाऱ्यालगत समुद्र खवळणार असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार असली तरी शुक्रवारपासून (ता.३) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

मंगळवारी (ता.३१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.९, नगर ३१.५, कोल्हापूर २६.४, महाबळेश्वर १९.३, मालेगाव ३१.०, नाशिक २८.४, सांगली २८.०, सातारा २६.६, सोलापूर ३२.३, मुंबई २९.५, अलिबाग ३०.१, रत्नागिरी २९.५, डहाणू ३२.१, आैरंगाबाद २९.४, परभणी ३२.७, नांदेड ३२.५, अकोला ३३.१, अमरावती ३१.४, बुलडाणा ३०.७, ब्रह्मपुरी ३३.२, चंद्रपूर ३३.६, गोंदिया ३१.०, नागपूर ३३.३, वर्धा ३३.२, यवतमाळ ३०.५.

इतर ताज्या घडामोडी
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...