agriculture news in marathi, Rise in temperature causes pest outbreak | Agrowon

तापमानातील वाढीमुळे किडींचा उद्रेक वाढण्याची शक्यता
वृत्तसेवा
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

कृषी क्षेत्रामध्ये विविध किडींचा उद्रेक वेगाने वाढत आहे. तयार होत असलेल्या अन्नाचा बारावा भाग हा किडींकडून फस्त होतो. वातावरणातील बदलांचे किडींवरील परिणामांचे विश्लेषण संशोधकांनी केले आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे किडींच्या चयापचयाच्या वेगामध्ये वाढ होत असून, त्यांच्या खाण्याचे प्रमाण व वेग वाढत आहे. भविष्यामध्ये किडी पिकांचा अधिक प्रमाणात फडशा पाडण्याचा धोका `सायन्स` या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. 

कृषी क्षेत्रामध्ये विविध किडींचा उद्रेक वेगाने वाढत आहे. तयार होत असलेल्या अन्नाचा बारावा भाग हा किडींकडून फस्त होतो. वातावरणातील बदलांचे किडींवरील परिणामांचे विश्लेषण संशोधकांनी केले आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे किडींच्या चयापचयाच्या वेगामध्ये वाढ होत असून, त्यांच्या खाण्याचे प्रमाण व वेग वाढत आहे. भविष्यामध्ये किडी पिकांचा अधिक प्रमाणात फडशा पाडण्याचा धोका `सायन्स` या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. 

तापमानातील वाढ किंवा वातावरण बदल यांचा फारसा विचार सामान्य माणूस किंवा शेतकरी करत नाही. मात्र, या घटकांचे परिणाम दैनंदिन जीवनाला व्यापून उरणारे असल्याची संशोधने सातत्याने पुढे येत आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक तापमानामध्ये १.७ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. या तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पॅरीस कराराद्वारे जागतिक पातळीवर सर्व देश आपापल्यापरीने कार्यरत असले तरी त्यातील राजकारण हा महत्त्वाचा विषय ठरत आहे. बाऊल्डर येथील
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने पिकाच्या उत्पादनाच्या सांख्यिकीचा आधार घेत किडींमुळे होत असलेले नुकसान मोजण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तापमानातील वाढीमुळे किडींच्या चयापचयाच्या दरावर व अन्य जैविक क्रियांवर होणारे परिणाम मोजण्यात आले. 

  •  या निष्कर्षामध्ये प्रदेशनिहाय, तापमानानुसार फरक दिसून आले. युरोपातील काही भागामध्ये तापमानवाढीमुळे मोठा फटका बसणार आहे. या शतकाच्या अखेरीला अकरा युरोपियन देशांमध्ये गहू पिकाचे ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान किडींमुळे होऊ शकते. त्यात ब्रिटन, डेन्मार्क, स्वीडन आणि आयर्लंड यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. 
  •  जागतिक शाश्वतता विषयक संशोधन गट - फ्यूचर अर्थच्या संचालिका व कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. जोशुआ तेवक्सबरी यांनी सांगितले, की काही थंड तापमान असलेल्या देशामध्ये किडींमुळे होणाऱ्या नुकसानीमध्ये वाढत्या तापमानाबरोबर वेगाने वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचा मोठा ताण शेतकऱ्यांवर असेल.
  •  प्रति अंश सेल्सिअस तापमानवाढीसाठी सरासरी २.५ टक्के पीक उत्पादन किडींच्या प्रादुर्भावामुळे घटण्याचा धोका आहे. ही घट एकूण तापमान परिणामांच्या घटीच्या तुलनेमध्ये अर्धी राहील. उत्तरेकडील शीत प्रदेशामध्ये तापमानातील वाढीचा यापेक्षाही अधिक फटका बसण्याची शक्यता प्रा. तेवक्सबरी व्यक्त करतात.   
  •  शेतकऱ्यांनी आतापासूनच उष्णता आणि कीड प्रतिकारक जातींच्या लागवडीकडे वळण्याची व त्यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी केली पाहिजे. पीक फेरपालटामध्ये त्यांचा वापर वाढवला पाहिजे. केवळ किडींच्या नियंत्रणासाठी अधिक कीडनाशकांचा वापर यासाठी उपयोगी ठरणार नाही, अशा कीडनाशक वापरातून आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या उलट वाढू शकतील. 

मका,भाताच्या उत्पादनावर परिणाम 
उत्तर अमेरिका आणि आशिया देशही किडींच्या प्रादुर्भावातून सुटणार नाहीत. अमेरिका हा जागतिक पातळीवरील सर्वाधिक मोठा मका उत्पादक असून, या पिकात २ अंश सेल्सिअस इतक्या तापमानवाढीच्या अंदाजामुळे किडींचा प्रादुर्भाव ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. प्रति वर्ष २० दशलक्ष टन उत्पादन घटेल. याच वेळी जागतिक भात उत्पादनाच्या एक तृतीअंश उत्पादन घेणाऱ्या चीनमधील भात उत्पादनातही किडींच्या उद्रेकामुळे सर्वाधिक २७ दशलक्ष टन प्रति वर्ष इतके नुकसान नोंदवले जाईल.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे...
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला...वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील...
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी...भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीरपुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच...
नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल...नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य...
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे...जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड...
नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळपनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड...
गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि...
अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार...सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान...
एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द...भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे...
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार...फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे...
बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना...कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी...
नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्...नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये...
यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंदयवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात...
माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरेमुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी...
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर...नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्पजळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील...
नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार...नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८...