agriculture news in marathi, Rivers flow through Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी, धरणांतून विसर्ग
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे : जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी (ता. २१) वाढला होता. दुपारनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढला. धरणांमध्येही पाण्याची आवक वाढल्याने विसर्गही वाढविण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत असून भीमा,  मुळा-मुठा, निरा नदीला पूर आला आहे.

पुणे : जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी (ता. २१) वाढला होता. दुपारनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढला. धरणांमध्येही पाण्याची आवक वाढल्याने विसर्गही वाढविण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत असून भीमा,  मुळा-मुठा, निरा नदीला पूर आला आहे.

पश्‍चिम भागातील पावसाचा जोर आणखी वाढला आहे. तर पूर्व भागातील दुष्काळी पट्‌ट्यातही हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मावळ, मुळशीसह भोर, वेल्हा, जुन्नर तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर उर्वरित तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला. पूर्व भागातील तालुक्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पावसाची नोंद झाली.

कुकडीचे खाेरे वगळता जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणे १०० टक्के भरल्याने ओसंडून वाहत आहेत. खडकवासला, मुळशी, पवना धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने मुळा-मुठेच्या पाणीपातळीत वाढ झाली असून दुथडी भरून वाहणाऱ्या उपनद्यांमच्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे. वीर धरणातील विसर्गामुळे नीरा नदीलाही पूर आला अाहे.

चासकमान ९ हजार क्युसेक, मुळशी १० हजार, खडकवासला धरणातून १८ हजार ५०० तर वीर धरणातून १४ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दौंड येथे भीमेच्या पात्रातून ३५ हजार क्युसेक वेगाने उजनी धरणात पाणी जमा होत आहे.

मंगळवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : पौड ३०, घोटावडे ३१, माले ४४, मुठे ९८, भोलावडे ८२, निगुडघर ६१, काले ६४, कार्ला ३२, लोणावळा ९६, वेल्हा ५७, पानशेत ४३, विंझर ३५, राजूर ५६, आपटाळे ३४, कुडे ३८.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...