agriculture news in marathi, Role of agricultural scientist important to double income of farmers: President | Agrowon

उत्पन्न वाढण्यात कृषी शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

कानपूर : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या सहभागाशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे अशक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

कानपूर : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या सहभागाशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे अशक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित शेती आणि हवामान बदल'' परिषदेत राष्ट्रपती कोविंद बोलत होते. राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुपटीने वाढविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी शेतीत आधुनिक बदल तसेच ''पर ड्रॉप मोर क्रॉप'' असे ध्येयधोरणे समोर ठेऊन प्रयोग करावे लागणार असून, कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रपती म्हणाले, शेतकरी जोडधंद्याच्या साह्याने आपले उत्पन्न वाढवू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती व्यतिरिक्त कुकुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यावसाय करावेत. शेतीमालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी पणनमध्ये सुधारणा आणि अन्नप्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगले दर मिळतील, असेही राष्ट्रपती कोविंद यांनी नमूद केले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगाशी संलग्न करण्यासंदर्भात बोलताना राष्ट्रपती म्हणाले, की देशातील ६० टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्याच्या स्थितीला देशातील १३ राज्य दरवर्षी दुष्काळी समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे शेतीसाठी पाण्याचे नियोजन, तसेच सुयोग्य वापर करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना जागरूक करण्याची आवश्‍यकता आहे.  

कर्नाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले, कर्नाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचऱ्यापासून सेंद्रिय खते तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. या व्यतिरिक्त झारखंड आणि ओरिसामधील शेतकऱ्यांनी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे विकसित केलेल्या आंब्याच्या आम्रपाली आणि मल्लिका या संकरित वाणांची लागवड केली आहे.

जय जवान जय किसान
घोषवाक्य ठरतेय उपयुक्त

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला ''जय जवान जय किसान'' नारा सध्याच्या काळात अधिक उपयुक्त ठरत असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. तसेच शेती क्षेत्राच्या विकासासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी ''शेती आणि हवामान बदल'' परिषदेला नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्स रिसर्च,  सोसायटी फॉर ॲग्रिकल्चर प्रोफेशनल ॲँड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च येथे एकत्र आले, हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती कोविंद यांनी काढले. या परिषदेला जपान, नेपाल आणि भूतान या देशांतील १५ कृषी शास्त्रज्ञांसह ६०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

इतर बातम्या
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
सोसायटीचा डाळिंबाचा विमा अडकलाआटपाडी, जि. सांगली ः मृग बहारात धरलेल्या डाळिंब...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
गडकरींनी घेतले ‘सरांचे’ आशीर्वादनागपूर ः मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
कमी उत्पादन आलेल्या मंडळांमध्ये विमा...परभणी ः खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रतिहेक्टरी...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...